ऊस विकला पण पैसे दिलेच नाहीत, शेतकऱ्यानं दिला जीव

ऊसाचं बिल न मिळाल्याने सोलापुरात शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या केली आहे.

सोलापूर, 04 ऑगस्ट : सोलापूरमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ऊसाचं बिल न मिळाल्याने सोलापुरात शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात हा प्रकार घडला आहे. शेतकऱ्याने साखर कारखान्याला उस पुरवठा केला पण कारखान्याने वेळेवर बिल न दिल्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सुर्यकांत पाटील असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.सुर्यकांत यांनी त्यांच्या शेतातला ऊस साखर कारखान्याला विकला. पण साखर कारखानदारांनी त्याचं बिल सुर्यकांत यांना दिलंच नाही. ऊसाचे बिल न आल्याने कर्ज फेडायचं कसं या चिंतेत सुर्यकांत होते. सुर्यकांत यांच्या पत्नी आजारी होत्या त्यामुळे दवाखान्याचा खर्च, घर खर्च, लाईटबील तसेच भावाच्या मुलीचे लग्न असल्याने घरात पैशांची खूप गरज होती. पण हातात पैसे नसल्याने परिस्थितीला कंटाळून सुर्यकांत यांनी आत्महत्या केली आहे.रिक्षा चालक होणार पिंपरी चिंचवडचे नवे महापौर, पहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

याचाच राग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखानदारांच्या घरासमोर घंटानाद करणार आहे. आता यातून पाटील कुटुंबियांना काही मदत होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण पाटील यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Trending Now