'नवज्योतसिंग सिद्धूचा शिरच्छेद केल्यास पाच लाखांचे बक्षीस'

नवज्योतसिंग सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा बजरंग दलाने केली आहे

आग्रा,ता,22 ऑगस्ट : पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या लष्करप्रमुखाला मिठी मारणारे काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा बजरंग दलाने केली आहे. बंजरंग दलाचा आग्रा विभागाचा अध्यक्ष संजय जाट याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सजंय जाटवर कारवाईची मागणी करण्यात येतेय. या व्हिडीओमध्ये संजय जाट हा पाच लाखांचा चेकही निर्लज्जपणे दाखवताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी कार्यक्रमाला सिद्धू गेले होते. त्यावेळी कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी तिथे पाकिस्तानचे लष्करप्रमुख बावजा आले आणि सिद्धू त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी गळाभेट घेतली.त्याचबरोबर सिद्धूंना बसण्यासाठी जी खुर्ची देण्यात आली होती त्याच्या शेजारीच पाकव्याप्त पाकिस्तानच्या अध्यक्षांनाही खुर्ची देण्यात आली होती. त्यावरून सिद्धूवर सध्या टीकेचा भडीमार सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सिद्धूच्या या वर्तनाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती.तर सद्भावनेच्या हेतुनेच भेट घेतल्याचं सांगत सिद्धूने त्याचं समर्थन केलंय. मला दहा वेळा निमंत्रण आलं होतं आणि परराष्ट्रमंत्रालयानेही मला जाण्याची परवानगी दिली असं असताना मी गेलो नसतो तर योग्य संदेश गेला नसता असही त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानात मात्र सिद्धू ला समर्थन मिळतंय.

I want to thank Sidhu for coming to Pakistan for my oath taking. He was an ambassador of peace & was given amazing love & affection by ppl of Pakistan. Those in India who targeted him are doing a gt disservice to peace in the subcontinent - without peace our ppl cannot progress

— Imran Khan (@ImranKhanPTI) August 21, 2018

Trending Now