सरकारने शेतीकडे दुर्लक्ष केल्यानेच देशाचा विकासदर घटला - शरद पवार

मोदी सरकारने कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळेच देशाचा विकास दर घसरल्याची टीका शरद पवारांनी केलीय.

Chandrakant Funde
07 जानेवारी, अकलूज : मोदी सरकारने कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळेच देशाचा विकास दर घसरल्याची टीका शरद पवारांनी केलीय. आम्ही पिकवण्याऱ्यांचा विचार करतो, आणि हे खाणाऱ्यांचा विचार करतात आजच्या राज्यकर्त्यांनी हे धोरण बदललं पाहिजे, पिकवणारा जगला तर खाणारा जगेल, बँकांचा तोटा भरून काढायला केंद्र सरकारने 80 हजार कोटी भरले पण शेतकऱ्याला कर्जमाफी देताना हे सरकार मात्र टाळाटाळ करतं, सहकारी सोसायट्यांवरचा 2000 कोटींचा बोजा उतरवायचा म्हटलं की यांच्या पोटात दुखतं, असंही शरद पवारांनी म्हटलंय. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरजही शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवली.कोरेगाव भीमा हिंसाचारावरून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. मुख्यमंत्री म्हणतात की, बाहेरच्यांनी हे कृत्य केलंय, तिथले ग्रामस्थही तेच म्हणताहेत, त्यामुळे हे दंगली घडवणारे बाहेरचे नेमके कोण लोक आहेत, हे सरकारने शोधून काढावं, असंही पवारांनी म्हटलंय.कृषी कर्जमाफीच्या मुद्यावरून पवारांनी संभाजी भिडे यांचं नाव न घेता टोला हाणलाय, काही लोक म्हणतात की 40 टन ऊस घेणाऱ्यांना कशाला पाहिजे कर्जमाफी, यावरूनच त्यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे हे स्पष्ट होतं. संभाजी भिडे यांनी कर्जमाफीवर टीका केली होती त्यालाही पवारांनी भाषणातून उत्तर दिलंय. कोरेगाव भीमाच्या दंगलीत काही हिंदुत्ववादी संघटनांनी चिथावणी दिल्याचं पवारांनीच सर्वप्रथम म्हटलं होतं. त्यावरूनच पवार आणि भिडे पुन्हा समोरासमोर आलेत.

Trending Now