समलैंगिकता गुन्हा की अधिकार, सुप्रीम कोर्ट आज देणार ऐतिहासिक निर्णय

मुंबई, 06 सप्टेंबर : समलैंगिकता हा गुन्हा की अधिकार यावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. कलम 377 नुसार समलैगिंकता गुन्हा आहे. त्यामुळे हे कलम कायदेशीर की बेकायदेशीर याविषयी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे. याआधी 2 जुलै 2009 मध्ये दिल्ली हायकोर्टानं ऐतिहासिक निकाल देत समलैंगिक संबंध कायदेशीर ठरवले होते. मात्र नंतर सुप्रीम कोर्टानं पुन्हा समलैंगिकता गुन्हाच आहे, असा निर्णय दिला होता. पण गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टानं स्वतःच आपल्या निर्णयावर फेरविचार करायचं ठरवलं आणि खटला पुन्हा सुरू झाला.त्यामुळे आता समलैंगिकता अधिकार की गुन्हा? या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. 17 जुलैला आपला निर्णय राखून ठेवला.सध्याच्या कलम 377 नुसार अनैसर्गिक संभोग हा गुन्हा असून या कलमाअंतर्गत दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे. दरम्यान समलैंगिकतेला कट्टरतावाद्यांचा विरोध असून यामुळे भारतीय समाज रसातळाला जाईल असा दावा केला जातोय.

जुलै 2009- समलैंगिकता गुन्हा नाही, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय- घटनेच्या कलम 14, 15 आणि 21चा भंग होता कामा नये - हायकोर्ट- नाझ फाऊंडेशनच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय- फक्त 0.3% लोकसंख्या समलिंगी, सरकारची भूमिका- त्यामुळे 99.7% टक्के लोकसंख्येच्या हक्कांचा भंग करता येणार नाही - सरकारडिसेंबर 2013- समलैंगिकता हा गुन्हाच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय- दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायदेशीररित्या टिकाव धरत नाही - सुप्रीम कोर्ट- कलम 377वर संसदेनं विचार करावा - सुप्रीम कोर्ट- नाझ फाऊंडेशनची फेरविचार याचिकाही फेटाळलीजानेवारी 2018- गोपनीयतेच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल- याचिका 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्गजुलै 2018- याचिकेवर सलग 4 दिवस सुनावणी- परस्पर सहमतीनं केलेल्या संभोगाला विरोध नाही - केंद्र सरकार- सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निर्णय- 6 सप्टेंबरला निर्णय - सुप्रीम कोर्ट कोण होते याचिकाकर्ते ?  - नवतेज जोहर, नर्तक- सुनील मेहरा, पत्रकार- रितू डालमिया, शेफ- अमन नाथ - हॉटेल व्यावसायिक- केशव सुरी - हॉटेल व्यावसायिक- आयेशा कपूर, उद्योजिका PHOTOS : शक्ती कपूरचा अॅडल्ट सीन पाहुन सेन्सर बोर्डलाही भरली होती धडकी !

Trending Now