रणवीर- दीपिकाच्या लग्नाला जायचंय.. तर या गोष्टीपासून रहावं लागेल दूर

यावर्षी २० नोव्हेंबरला रणवीर सिंग दीपिका पदुकोण इटली येथील लेक कोमो येथे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणार आहेत. इटली हे दीपिका आणि रणवीरचे सर्वात आवडते ठिकाण आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडणार आहे.

यावर्षी २० नोव्हेंबरला रणवीर सिंग दीपिका पदुकोण इटली येथील लेक कोमो येथे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणार आहेत. इटली हे दीपिका आणि रणवीरचे सर्वात आवडते ठिकाण आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडणार आहे. `सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीर- दीपिकाच्या या ग्रॅण्ड वेडिंगची तयारी सुरु झाली आहे. या लग्नात फक्त जवळच्या ३० जणांना आमंत्रण देण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील सोनम- आनंद आणि विराट- अनुष्का यांनीही ग्रॅण्ड वेडिंग केले होते. त्यांच्या लग्नातले फोटो काही क्षणांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे रणवीर- दीपिका यांना त्यांचं लग्न खासगीत करायचं आहे.

दीपिकाला तिच्या लग्नाचे कुठलेच खासगी फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्यायचे नाहीयेत. रणवीर- दीपिकाला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे शाही फोटो सर्वांसोबत शेअर करायचे आहेत. त्यामळे दीपिकाचा हा निर्णय कितपत यशस्वी होतोय ते आता वेळ आल्यावरच कळेल.

Trending Now