व्यभिचाराच्या प्रकरणात महिला गुन्हेगार नाही -सुप्रीम कोर्ट

लग्नानंतर परपुरुषासोबत संबंध ठेवणाऱ्या महिला या गुन्हेगार नसतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्यामुळे व्यभिचार प्रकरणात परपुरुषच दोषी असेल

नवी दिल्ली, 01 आॅगस्ट : लग्नानंतर परपुरुषासोबत संबंध ठेवणाऱ्या महिला या गुन्हेगार नसतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्यामुळे व्यभिचार प्रकरणात परपुरुषच दोषी असेल. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने व्यभिचार हा गुन्हा असेल की नाही याचा विचार करू असंही सांगितलं.सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की, आयपीसी कलम 497 मध्ये बदल करू शकत नाही. या कलमाअंतर्गत कुणाच्याही पत्नीसोबत अवैध संबंध ठेवणार पुरूषच दोषी असणार आहे.खंडपीठ हे याचाही विचार करतोय की हे समान अधिकाराचं उल्लंघन तर नाही. कारण व्यभिचार करणारी महिलेला कायद्यानुसार कारवाई करण्यास कोणतेही तरतूद नाहीये.

या प्रकरणी केंद्र सरकारने शपथपत्र दिले आहे. आयपीसी कलम 497 आणि सीपीसी कलम 198(2) रद्द केले तर भारतीय संस्कृतीवर याचा परिणाम होईल जे की लग्न संस्थेवर आणि पावित्र्याला धरून आहे.मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला कलम 497 वैधतेसाठी नोटीस पाठवली होती. हा कायदा आता प्राचीन वाटतोय आणि महिला आणि पुरूष समान मानत नाही. पण केंद्राने आपल्या शपथ पत्रात कलम 497 योग्य असल्याचं नमूद केलं होतं.केरळमध्ये राहणारी जोसेफ शीनने कोर्टात याचिका दाखल केली होती. यात कलम 497 च्या वैधताचा विचार व्हावा यामुळे लिंगभेद भाव होत असल्याचा दावा केला होता.एखाद्या संबंधात फक्त पुरुषच दोषी का ठरवला जाऊ शकतो ? का महिला यात दोषी ठरू शकत नाही ? कुणाच्या पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे यात फक्त पुरुषांनाच जेल का झाली पाहिजे ? जर त्या स्त्रीच्या पतीच्या मर्जीने सहमती मिळत असले तर हे नाते संपुष्टात आले पाहिजे ? लग्नानंतर अशा संबंधात स्त्री फक्त बाहुलं म्हणून वापरली जात नाही का ? असे प्रश्न या याचिकेत करण्यात आले होते.काय आहे कलम 497कलम 497 हे लग्नानंतर अवैध संबंध ठेवण्याबाबत आहे. यात जर एक पुरुष जर कुणाच्या पत्नीसोबत संबंध ठेवत असले तर तो गुन्हेगार ठरवला जातो. यात पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण पत्नीला यात दोषी ठरवता येत नाही त्यामुळे तिला कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही.हेही वाचाVIDEO : नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीची लोकांना शिवीगाळ,व्हिडिओ व्हायरल#गुडन्यूज : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाने जोडणार, 325 किमी अंतर होणार कमी !इम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण ; आमिर,कपील देव,गावस्कर जाणार ?

Trending Now