आता तुमचं घरच तुम्हाला देईल पेन्शन, अनेक बँकांनी सुरू केली स्कीम

जेव्हा एखादा मध्यमवर्गीय माणूस घर घेण्याचा विचार करतो तेव्हा तो आयुष्याची सर्व जमापूंजी घर खरेदी करण्यात लावतो. निवृत्तीनंतर जमवलेली रक्कम तो घर बांधणीमध्येच लावतो. त्यातही तुम्ही खासगी कंपनीत कामाला आहात तर पेन्शनची चिंता नेहमीच सतावत असते. आज आम्ही तुम्हाला एक अशी योजना सांगणार आहोत ज्याने निवृत्तीनंतरही तुम्ही चिंता मुक्त असू शकाल. जर तुमच्याकडे घर आहे तर एसबीआय आणि पीएनबी बँक त्यांच्या नव्या योजनेनुसार बँका तुम्हाला पेन्शन देणार. निवृत्तीनंतर तुमचं घर दरमहिन्याला तुम्हाला पेन्शन देऊ शकते. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकसह इतर बँकांची रिवर्स मोर्गेज स्कीम तुम्हाला दर महिना ठराविक रक्कम देऊ करते.

या योजनेअंतर्गत घरमालकाला मिळालेले पैसे हे पूर्णपणे त्याचे असतात. बँकेला परत करावे लागत नाहीत. राहत घर त्यांच्याकडे गहाण ठेवल्यानंतर बँक त्यावर प्रत्येक महिन्याला किती पैसे देईल हे त्या प्रॉपर्टीवर अवलूबून असते. याशिवाय घरमालक स्वतःच्या घरी राहू शकतो. रिवर्स मोर्गेज स्कीमनुसार घरमालकाच्या मृत्यूनंतर ते घर बँकेचे होऊन जाते. तसेच जर घरातील कुटुंबियांना ते घर परत मिळवायचे असेल तर घराची किंमत चुकवून ते घर परत मिळवता येते. कोणाला आहे या योजनेचा फायदा- कोणताही भारतीय ज्याचे वय ६० वर्ष आणि त्याहून जास्त असेल त्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. जर पती आणि पत्नी मिळून या योजनेत सहभागी होऊ इच्छितात अशावेळी पत्नीचे वय किमान ५८ वर्ष असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत बँक १० ते १५ वर्षांसाठी दरमहिन्याला ठरलेली रक्कम देते. एबीआय या योजनेअंतर्गत ३ लाख ते १ कोटी रुपयांचे कर्ज देते. महिला आणि अन्य लोकांना एसबीआय या योजनेनुसार ११ टक्के व्याजावर कर्ज देते. तर एसबीआय पेंशनर्सला वर्षाकाठी १० टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. कोणासाठी फायदेशीर- जर कोणत्या व्यक्तीकडे निवृत्तीनंतर आपल्या गरजा पूर्ण करण्याचे दुसरे कोणतेही साधन नसेल, पण ज्यांचे स्वतःचे घर आहे त्यांना ही योजना फायदेशीर आहे. अशावेळी आपले घर गहाण ठेवून ते बँकेकडून दरमहिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. भारतात फक्त ७ टक्के तरुणांकडे पेन्शन कव्हर आहे. म्हणजे फक्त ७ टक्के तरुणांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल. उरलेल्या ९३ टक्के तरुणांची पेन्शनची काहीही सुविधा नाही. त्यामुळे जोवर देशात पेन्शनची योग्य व्यवस्था होत नाही तोवर रिवर्स मोर्गेज स्कीमचा फायदा घेता येऊ शकतो.

Trending Now