VIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...

सांगली, 01 आॅगस्ट :  सांगली आणि जळगाव महानगर पालिकांसाठी आज मतदान पार पडलं. पण प्रभाग 15 मध्ये काँग्रेसला मतदान केल्यावर भाजपला मत जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं.सांगलीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तिथल्या एका मतदान केंद्रावर काँग्रेसला मतदान केलं तरी ते भाजप जात असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय यावरूनच दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना १४ क्रमांकाच्या बूथबाहेर जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आरोपानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 15 च्या बूथची पाहणी केली. ईव्हीएममशीनमध्ये अशी कोणतीही गडबड झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या अधिकाऱ्यांनी आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही सोबत ठेवले होते. त्यांनाही ईव्हीएममध्ये कोणताही बिघाड नसल्याचं दाखवलं.

दरम्यान, ही घटना वगळता सांगलीत मतदान शांततेत पार पडलं. 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हे गाव असल्याने पाटील गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीत तळ ठोकून आहेत. त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर भाजपच्या वतीनं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आघाडी सांभाळली. तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत असून खासदार गजानन किर्तिकर यांनी शिवसेनेचा गढ सांभाळला. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलेलं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगलीत प्रचाराला जाता आलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड खेचून आणण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. तर वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसलीय.जळगावात कारमध्ये सापडली रोकडतर जळगाव महापालिकेसाठी मतदान सुरू असताना शहरातील समतानगर भागात एका वाहनात मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे यांच्या मालकीचे असलेले हे वाहन रामानंद पोलिसांनी जप्त केले आहे.जळगावात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर समतानगर भागात स्टेट बँक कॉलनी येथे भुसावळ नगर परिषदेच्या सार्वजनीक बांधकाम विभाग सभापती असा फलक असलेली एम.एच. १९, बीडी ४१४१ या क्रमांकाची कार उभी होती. संशय आल्याने नगरसेवक नितीन बरडे यांनी या बाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता, त्यात मोठी रक्कम आढळून आली. पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे. ही कार भुसावळ येथील भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर येत आहे. कारमध्ये सापडलेली रक्कम किती होती याबाबत अद्याप पोलिसांनी खुलासा केलेला नाही. हेही वाचाजळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला

जळगावात मतदान सुरू असताना एका वाहनात सापडल्या नोटा

VIDEO : 'आम्ही जर नसलो तर कसं होणार?,आम्हाला आमचा धंदा करू द्या'

 

Trending Now