कोणाला कधी,कसे संबोधावे याचे नियमच करा, आणखी एका कलाकारानं सचिन कुंडलकरला फटकारलं

फेसबुकवर प्रचंड टीका सुरू आहे. अभिनेता मिलिंद शिंत्रे यांनीही सचिन कुंडलकरला उपरोधिक फटके मारलेत.

मुंबई, 25 आॅगस्ट : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर सर्वच कलाकारांनी आपला शोक व्यक्त केला होता. त्यावर दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं एक फेसबुक पोस्ट टाकली होती. अभिनेते विजय चव्हाण आजारी असताना किती लोक त्यांना भेटायला गेले, असा सवाल करत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी विजूमामा म्हणत शोक व्यक्त करणाऱ्यांना उपरोधानं फटकारले. आता मामा मामा म्हणणारे ते आजारी असताना कुठे होते असा सवाल कुंडलकरांनी विचारला होता. त्याला अनेकांनी उत्तरं दिली. फेसबुकवर प्रचंड टीका सुरू आहे. अभिनेता मिलिंद शिंत्रे यांनीही सचिन कुंडलकरला उपरोधिक फटके मारलेत.

काय म्हणाले मिलिंद शिंत्रे?

कुंडलचे थोडक्यात म्हणणे असे आहे, [ नुसते कुंडल अशासाठी लिहिले आहे की मामा, काका ज्याप्रमाणे उठसूट म्हणायचे नसते, तसेच पूर्ण नावही घ्यायचे नसते. त्याचप्रमाणे लांबलचक नावांचा किंवा आडनावांचा short form केला की वापरायला बरे पडते. उदा. टिळकला किंवा गंधर्वला नाटक आहे. तर.... ] दुःख किंवा शोक नीट पद्धतीने व्यक्त करा......तर आता हे कसे करायचे ?? यावर मला एक युक्ती सुचलेली आहे. कुंडलने शोक किंवा दुःख कसे व्यक्त करावे याचे क्लासेस सुरू करावेत. एक शोकसंहिता तयार करावी. ती पाळणाऱ्याला शोकसम्राट किंवा सम्राट-ए-शोक अशी पदवी द्यावी. धाय मोकलून, मुळूमुळू, आक्रंदून, भसाड्या आवाजात, बांगड्या फोडून, ढसाढसा, ओक्साबोक्षी आणि मूकपणाने असे जे रडण्याचे प्रकार आहेत, ते कुठे कसे वापरावेत, याबद्दल रुदनसंहिताही कुंडलने तयार करावी.तसेच कुंडलने एक संबोधसंहिताही तयार करावी. म्हणजे कोणी , कोणाला, कधी आणि कसे संबोधावे, याचे तिच्या मायला नियमच करावेत. सई, स्पृहा, अमेय, उमेश किंवा कोणत्याही नट नटीला काका,मामा, मावशी, आत्या, मामंजी किंवा अजून काही म्हणावे का ? किंवा का म्हणावे ? की म्हणूच नये ? असे काही नियम आज महाराष्ट्रात तयार होण्याची गरज आहे. तसेच समाजाने भावनाप्रधानता गुंडाळून ठेवावी. तसाही आता कला आणि भावना यांचा फारसा संबंध राहिलेला नसल्याने, फार अडचण येणार नाही. खालील वाक्ये कोणीही उच्चारू नये. कारण त्यात भावना खूप जास्त आहेत. भाबडेपणा पराकोटीचा आहे आणि महत्वाचे म्हणजे भौतिकशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांचे नियम पाळले जात नाहीत.विजय चव्हाण यांनी मोरूची मावशी, दांडेकरांचा सल्ला, टूरटूर, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक दर्जेदार नाटकातून, तसेच अनेक सीरिअल्स आणि सिनेमातून जबरदस्त, solid, भन्नाट रोल्स केले, ते आम्ही वर्षानुवर्षे बघितले, आम्ही भरपूर  हसलो, आमचं आयुष्य ज्या अनेक कलाकारांनी सुसह्य आणि धम्माल बनवलं, त्यात विजूमामा नक्कीच आहेत, आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला जरी गेलो नसलो, तरी त्याचा अर्थ, त्यांच्या जाण्याने आम्हाला दुःख झालेले नाही, असा होत नाही. तसा प्रायोगिक अर्थ कोणीही काढू नये. आम्हाला आणि रसिक प्रेक्षकांना जरा, मनमोकळेपणाने व्यक्त होऊ दे. त्यांच्यावर सतत कुठले तरी, कवच किंवा कुंडल, यातले काहीही नसू दे, अशीच मी कधी रिटायर न झालेल्या नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो.हेही वाचा

'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं

PHOTOS - असा रंगला 'उंच माझा झोका'

आदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

Trending Now