संघ विचाराच्या प्रचारासाठी आता 'सोशल मीडिया'चा वापर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचे भारतीय समाजातले समज-गैरसमज दूर व्हावेत, आणि संघ विचारांचा सर्वदूर प्रसार व्हावा, यासाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी आता सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणापर वापर सुरू केलाय.

Chandrakant Funde
21 नोव्हेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचे भारतीय समाजातले समज-गैरसमज दूर व्हावेत, आणि संघ विचारांचा सर्वदूर प्रसार व्हावा, यासाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी आता सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणापर वापर सुरू केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'आरएसएस' या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून संघ परिचय या नावाने काही प्रचार व्हिडिओ अपलोड करण्यात आलेत. या व्हिडिओज् मधून डॉ. मनमोहन वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या संघाबाबतच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत.राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर विरोधकांकडून जातीवादाचा नेहमीच आरोप होत आलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी डॉ. मनमोहन वैद्य यांनी'हिन्दव:सोदरा: सर्वे, न हिन्दू: पतितो भवेत्' या ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजात कुठलाही जातीभेद मानत नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यासाठी त्यांनी संघाचे 4 थे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी वसंत व्याख्यानमालेत अस्पृश्यता निर्मुलनासंबंधी दिलेल्या व्याख्यानाचाही दाखला दिलाय. यासोबतच 'संघ एक परिचय' हा दुसरा व्हिडिओही या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आलाय.

संघाच्या या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून आतापर्यंत 170 ट्विट करण्यात आले असून या अकाऊंटला तब्बल 6 लाख 78 हजार नेटीझन्स फॉलो करतात. या अकाऊंटवरून प्रामुख्याने सरसंघचालक मोहन भागवत यांची भाषणं आणि संघ विचारासंबंधीचे ट्विट्स केले जातात. 

Trending Now