आमदारांचं प्रगतीपुस्तक : काँग्रेसचे अमिन पटेल पहिले तर राम कदमांचा शेवटचा नंबर!

प्रजा फाऊंडेशन आमदारांचं रिपोर्ट कार्ड जाहीर केलंय.

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई, 21 आॅगस्ट : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कर्तृत्वान आमदारांची यादी जाहीर करण्यात आलीय. शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मुंबईत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला आहे. गेली 3 वर्ष ते सातत्याने क्रमांक एकवर राहण्याचा बहुमान पटकावलाय. तर भाजपचे आमदार राम कदम यांचा शेवटून पहिला नंबर म्हणजे 32 वा क्रमांकावर आहे.प्रजा फाऊंडेशन आमदारांचं रिपोर्ट कार्ड जाहीर केलंय. या अहवालानुसार अमीन पटेल हे मुंबईतले क्रमांक एकचे आमदार आहेत. गेली 3 वर्षे सातत्याने ते क्रमांक 1 वर राहण्यात यशस्वी ठरलेत. तर त्यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 3 क्रमांकावर  अतुल भातखलकर आहे. घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम हे शेवटच्या म्हणजेच 32 व्या क्रमांकावर आहेत.असा केला जातोय सर्व्हे

भारतीय राज्य घटनेमध्ये आमदारांसाठी कामाची नियमावली केली आहे. या नियमावलीनुसार प्रजा फाऊंडेशनने आमदारांचं प्रगतीपुस्तक काढलंय. यामध्ये आमदाराचे काम, विधानसभेत हजेरी, मागील आणि चालू कामाचा आढावा घेतला जातोय. या बद्दल नागरिकांचा सर्व्हे केला जातो. विधानसभेत त्यांनी किती प्रश्न विचारले किती प्रश्न उपस्थितीत केले याबद्दल विचार केला जातो. गुन्हेगारीबद्दल आमदारांवर किती गुन्हे दाखल आहे याचाही विचार केला जातोय. यात 40 टक्के गूण हे जनतेच्या मतांवर आधारीत असतात.टाॅप पाच आमदारअमिन पटेलसुनील प्रभूअतुल भातखळकरसुनील शिंदे अस्लम शेखतसंच प्रजा फाऊंडेशनने निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर आमदारांवरील असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची आकडेवारी नुसार सगळ्यात जास्त क्रिमिनल केस असल्याचीही यादी केलीय. यात फक्त असे गुन्हेच विचारात घेतले गेलेत ज्यात 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच आमदारांनी शपथपत्रात कोणत्या गुन्ह्यांची माहिती दिली. आमदार झाल्यानंतर कोणते गुन्हे दाखल झाले. तसंच किती गुन्ह्याबद्दल आरोपपत्र दाखल झाले याचा विचार केला जातो.आमदारांवर गुन्हे1) सदा सरवणकर 27 गुन्हे2) अबू आझमी 123) राम कदम 124) प्रकाश मेहता 125) अजय चौधरी 96) सरदार तारा सिंग 9 VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी

Trending Now