जीओ प्राईम मेंबरशीपसाठी उद्या अखेरचा दिवस, ग्राहकांची गॅलरीत गर्दी

जीओची सेवा सुरू ठेवण्यासाठी जीओ प्राईमच्या मेंबरशीपसाठी ग्राहकांनी जीओ गॅलरीत गर्दी करायला सुरुवात केलीये.

Sachin Salve
30 मार्च : मोबाईल क्षेत्रात 'डेटा'गिरी करणाऱ्या रिलायन्स जीओची मोफत सेवा आता उद्या अखेर बंद होणार आहे. त्यामुळे जीओची सेवा सुरू ठेवण्यासाठी जीओ प्राईमच्या मेंबरशीपसाठी ग्राहकांनी जीओ गॅलरीत गर्दी करायला सुरुवात केलीये.रिलायन्स जीओने गेलं वर्षभर मोफत सुविधा देऊन 4 जी सेवेचा नवा अवतार लाँच केला. सुरुवातील अनलिमिटेड आणि त्यानंतर दररोज एक जीबी डाटा देणाऱ्या जीओची ग्राहकांना भुरळ पाडली. पण आता गेलं वर्षभर सुरू असलेली मोफत सुविधा 1 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. जीओची सुविधा सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना 99 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार असल्यानं ग्राहकांनी गर्दी केलीये.जीओ प्राईम ग्राहकांना 1 एप्रिलनंतर जीओचे वेगवेगळे प्लॅन मिळणार आहेत. अनलिमिटेड सेवे सुरू ठेवण्यासाठी 303 रुपयांचा  जीओ प्राईम प्लॅन सुरू केलाय त्यामुळे पुढील वर्षभर 'डेटा'गिरी करता येणार आहे. जीओ सुविधेचा लाभ घेण्यासाठी आता ग्राहकांनी आता जीओ गॅलरी गाठलीये.

Trending Now