रिलायन्स जिओ गीगा फायबर आणि नवीन फोन लाँच

आज रिलायन्स इंडस्ट्रीजची 41 वी वार्षिक सभा पार पडली. या सभेत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी महत्त्वाचा घोषणा केल्यात

Sachin Salve
मुंबई, 05 जुलै : आज रिलायन्स इंडस्ट्रीजची 41 वी वार्षिक सभा पार पडली. या सभेत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी महत्त्वाचा घोषणा केल्यात. रिलायन्स ही खाजगी क्षेत्रात सर्वात जास्त टॅक्स देणारी कंपनी ठरलीये. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये कंपनीचा नफा 20.6 टक्क्यांना वाढून 36,076 कोटी राहिलाय. भारताच्या एकूण एक्सपोर्टमध्ये रिलायन्सचा 8.6 टक्के हिस्सा आहे.सहा महत्त्वाच्या घोषणा1) दुप्पट झाले जिओ ग्राहक - रिलायन्स जिओ देशातील 99 टक्के लोकांपर्यंत पोहचण्याचं लक्ष्य आहे. प्रत्येक जिल्हा, गावापर्यंत जिओ पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरमहिन्याला 240 कोटी जीबी डेटा वापरला जातोय. जिओकडे आज 22 कोटी ग्राहक आहे

(3) स्वस्तात ब्राॅडबँड - जिओ गीगा फायबर नावाने रिलायन्सने ब्राॅडब्रँड सेवा लाँच केलीये. या सेवेसाठी रिलायन्सने 2.5 कोटींची गुंतवणूक केलीये.  4) जिओ गीगा फायबर - जिओ गीगा फायबर सेवेसाठी  15 आॅगस्टपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. सुरुवातीला 1001 शहरांमध्ये ही सुविधा लाँच केली जाईल. तसंच myjio.com या वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. एका तासात गीगा फायबर सेवा सुरू होईल. 5) जिओ फोन - 21 जुलैपासून जुना जिओ फोन बदलता येणार आहे. माॅन्सून आॅफरमध्ये 501 रुपयांमध्ये जुना फोन बदलून नवीन जिओ फोन मिळेल. 15 आॅगस्टपासून जिओ फोन बाजारात उपलब्ध होईल. नवीन जिओ फोनची किंमत 2999 इतकी असणार आहे.6) रिटेल -रिलायन्स रिटेलने या वर्षी 4000 नवे स्टोर सुरू केले. यात 1 वर्षात 5 लाख टन पेक्षा जास्त साहित्य विक्री झाले.(डिस्क्लोजर : news18lokmat.com हा नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग असून या कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आहे. रिलायन्स जिओसुद्धा याच कंपनीचा भाग आहे) 

Trending Now