राम कदम यांच्यावर 'ट्रोल धाड' : सोशल मीडियावर 'बेटी भगाओ' व्हायरल

मुंबईच्या एका दहीहंडी कार्यक्रमात मुलगी पळवण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली आहे. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.

मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली आहे. विरोधकांनी राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतल्यावर आता सोशल मीडियानं राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.  

  फेसबुक, व्हॉट्सअॅपवर राम कदम यांच्या विधानाची खिल्ली उडवण्यात येत आहे. राम कदम यांच्यावरील विनोद मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.बेटी बचाओ मोहिमेला हे असं लक्ष्य करण्यात आलं.  सामान्य नागरिकांबरोबर सेलेब्रिटींमधूनही राम कदम यांच्या वक्तव्याबद्दल नाराजीचा सूर उमटला. अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी या शब्दांत फेसबुकवर टीका नोंदवली. राम कदम हा विषय बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होता. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काही जण आपल्या कल्पनाशक्तीचा असाही वापर करत होते. राम कदम त्यांच्या वाक्य़ामुळे फेसबुकवर ट्रोलर्स ‘सोचता हू कितने मासूम थे.. क्या से क्या बन गये’ अशा प्रकारे पोस्ट टाकत आहेत. त्याचबरोबर ‘डॅशिंग आ. राम कदम’ असं हेडिंग देऊन हरवलेलं प्रेम परत मिळवा अशा प्रकारचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. मध्यंतरी सोशल मीडियावर हे शिवडे प्रकरण गाजल्याचं आठवत असेल. कुणी प्रेमवीराने मध्यंतरी पुण्याच्या रस्त्यारस्त्यांवर आपल्या गर्लफ्रेंडची समजून काढण्यासाठी अशी पोस्टर्स लावली होती. पुढे त्या प्रेमवीरावर पोलीस कारवाईही झाली. पण आता राम कदमांच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे पोस्टर व्हायरल झालं. मुलगी लग्नाला नाही म्हणत असेल तर मी मदत करेन, पळवून आणून लग्न लावून देईन अशा अर्थाचं वक्तव्य राम कदम यांनी केलं होतं. आता सोशल मीडियानं राम कदम यांच्यावर अशा पोस्ट्सनी निशाणा साधला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतल्या जेठालालचं पात्रही राम कदम यांना ट्रोल करण्यासाठी हे असं वापरलं गेलं. एकदा विषय मिळाला की, एखाद्याला ट्रोल करण्यासाठी नेटिझन्स काय काय करतील याचा नेम नाही. हे असं कुठल्या फोटोला कुठे वापरून त्यावर राम कदम यांनी भाषणातून दिलेला पोन नंबर टाकण्याची कल्पना कुणा अवलियाची याची माहिती नाही. पण हा फोटो बराच व्हायरल झाला हे खरं.  

Trending Now