बहुमत मिळवून मोदींनी केलं काय, तर नोटबंदी - राज ठाकरेंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेनं कधी नव्हे एवढं बहुमत दिलं. निवडून आल्यावर काय दिवे लावले तर नोटबंदी केली अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

धुळे, ता. 2 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेनं कधी नव्हे एवढं बहुमत दिलं. ऐतिहासिक बहुमतानं जिंकून दिलं आणि त्यांनी निवडून आल्यावर काय दिवे लावले तर नोटबंदी केली अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी धुळ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा झाला, त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ज्या व्यापाऱ्यांनी मोदींना साथ दिली त्याच व्यापाऱ्यांची त्यांनी नोटबंदी करून वाट लावली. पाच वर्ष त्यांनी फक्त थापाच मारल्या, एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही अशी टीकाही त्यांनी केली.

माओवाद्यांकडून दोन आदिवासींची गळा चिरून हत्या

देशात निवडणूकांशिवाय दुसरा उद्योग उरला नाही. सारख्या निवडणुका सुरूच असतात. त्याच्यासाठी पैसा पाहिजे, मग पैशासाठी निवडणूका असच दुष्टचक्र राहिलं तर देशाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या पक्षातील माणसे घेऊन निवडणूक लढवायची हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली. भाजपकडे निवडणूक लढवायाल उमेदवार नसल्याचंही ते म्हणाले.

PHOTOS : बिग बींच्या लेकीनं उघडलं फॅशन स्टोअर, कोणी कोणी लावली हजेरी?स्मार्ट सिटीच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ मोठ्या गप्पा मारल्या. नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. नंतर ते नाशिककडे फिरकलेही नाहीत. मनसेच्या काळात जी विकासकामे झालीत तीच आज स्मार्ट सिटीच्या नावाने खपवत आहेत अशी टीकाही राज यांनी केली.धुळे काय पॅरिस आहे का?राज्यातल्या अन्य शहरांच्या तुलनेत धुळे शहर बरं आहे. पण बरं आहे म्हणजे ते काही पॅरिस नाही. पूर्वी धुळे हे राज्यातलं सर्वात श्रीमंत शहर होतं, त्या शहराची आज धुळधाण झाली. सर विश्वैश्वरैय्या यांनी या शहराची रचना केली. आज तेच डोक्याला हात लावून बसले असतील, विकास नाही तर शहरं यांनी भकास केल्याचा आरोपही त्यांनी केला.VIDEO : 'नो गुंडे, ओन्ली मुंडे', नाशिककर उतरले रस्त्यावर 

Trending Now