रेल्वेमंत्री भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीत मग्न,सेना खासदार संतापून पडले बाहेर !

मात्र तिथेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मंत्री महोदयांच्या साधे दर्शनही लोकप्रतिनिधींना घडले नाही.

News18 Lokmat
स्वाती लोखंडे-ढोके, 31 आॅगस्ट : मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस वर बोलावलेल्या बैठकीत सर्व आमदार आणि खासदारांना सुमारे दोन तास ताटकळत ठेवले आणि बैठकीच्या सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांना भेटत लोकप्रतिनिधीकडे दुर्लक्ष केलं. मंत्री महोदयांच्या बैठकीला आपापल्या क्षेत्रातील समस्यांवर अभ्यास करून आलेल्या आमदार आणि खासदारांचा या अशा पाहुणचारामुळे हिरमोड झाला आणि अनेकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.रेल्वेमंत्र्यानी रीतसर लेखी पत्रक पाठवून मुंबईतील मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आमदार आणि खासदारांना 31 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत बैठकीसाठी आमंत्रित केले.

मुंबईत रेल्वेला 'लाईफलाईन' मानलं जातं असल्याने सर्वच आमदार आणि खासदार आपापल्या परीने समस्यांचा अभ्यास करून दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथी गृहावर दाखल झाले. बैठकीच्या सभागृहाबाहेर असलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत लोकप्रतिनिधी सभागृहात दाखल झाले खरे, मात्र तिथेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मंत्री महोदयांच्या साधे दर्शनही लोकप्रतिनिधींना घडले नाही. कार्यकर्त्यांचा गराडा कमी होईल, या प्रतीक्षेत तासभर बसूनही काही उपयोग नसल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, खासदार अरविंद सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर यांनी या बैठकीतूनच काढता पाय घेतला. तर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, आमदार राहुल नार्वेकर, आमदार कालिदास कोलमकर हे बराच वेळ ताटकळत बसले होते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा स्थितीत खासदार गोपाळ शेट्टी, खासदार कपिल पाटील, आमदार राज पुरोहित, आमदार भाई गिरकर तिष्ठत बसले होते.मुंबई अध्यक्ष जोमातया बैठकीत मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मात्र भरपूर वेळ दिला. शेलारांसोबत आलेले कार्यकर्ते आणि शेलार यांच्याशी मंत्री महोदयांनी बराच वेळ गप्पा मारल्या.-------------------------------------------------------------------------------VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

Trending Now