देशाच्या परराष्ट्र सचिवपदी पुण्याच्या विजय गोखले यांची नियुक्ती

विजय केशव गोखले यांची देशाच्या परराष्ट्र सचिव पदी नियुक्ती झाली आहे. गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. हा बहुमान मिळवणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन आणि पुणेकर ठरले आहेत

Chandrakant Funde
01 जानेवारी, नवी दिल्ली : विजय केशव गोखले यांची देशाच्या परराष्ट्र सचिव पदी नियुक्ती झाली आहे. गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. हा बहुमान मिळवणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन आणि पुणेकर ठरले आहेत. विद्यमान परराष्ट्र सचिव एस जयशंकर येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा कार्यकाल संपणार आहे. त्यांच्या जागी गोखले रुजू होणार आहेत.गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1981 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. हाँगकाँग, हनोई, बिजिंग इथं भारताचे राजदूत म्हणून काम केलं आहे. यापूर्वी पुण्याचे राम साठे यांनीही परराष्ट्र सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

Trending Now