- 'थिंक टँक'ने धोरणं तयार करायची आणि दुसऱ्या फळीने ती अमंलात आणायची अशी योजना. पुण्यातली एल्गार परिषद ही त्याच योजनेचा भाग.
- विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करून ते प्रोफेशनल क्रांतिकारी बनतील याची तयारी. विविध परिषदांमधून एवढे टोकाचे विचार मांडायचे की दंगलीला पोषक वातावरण निर्माण होईल.
- नरेंद्र मोदी सरकारने विरोधी चळवळींना दडपून टाकण्याचं काम सुरू केलंय. माओवाद्यांची क्रांती अयशस्वी करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हंट 3 सुरू केलंय.
- देशात अँटी फॅसिस्ट फ्रंट तयार करण्याचा प्रयत्न करण्याचा माओवाद्यांचा कट
- भाकप माओवादी ही क्रांती करणारी एकमेव पार्टी आहे. त्यामुळे क्रांतीची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल.
- गडचिरोलीच्या खोट्या एन्काऊंटरचा अभ्यास करण्यासाठी सत्य शोधन समिती बनवा आणि विद्यार्थ्यांना जोडून घ्या.
- अरुण परेरा हा अनेक विद्यार्थी चळवळीत आपली विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न करतोय ,विद्यार्थ्यांना चळवळीत घ्या त्यांना जंगलात पाठवून ट्रेनिंग द्या
- मुंबई पुणे आणि आणखी शहरांमध्ये राजकीय खुनाचं (रोहित वेमुला प्रकरणासारखं) भांडवल करा.
- या सगळ्यात वरवरा राव यांनी भूमिका फार मोठी. शस्त्रांच्या खरेदीचे सगळे अधिकार त्यांच्याकडे होते यावरून त्यांचा सहभाग स्पष्ट होतो
- माओवाद्यांचा सर्वोच्च नेता कॉम्रेड गणपती याने वर्णन गोंसलविस याच्या भेटीसाठी वेळ मागितलीय. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि कोकण भागात काही समर्थक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न.
- सुरेंद्र गडलिंग यांनी प्रकाश याना लिहिलेलं आणखी एक पत्र. वरवरा राव यांच्याकडून फंड आलाय ,आपण फॅक्ट फाईंडिंग कमिटी साठी ही फंड गोळा करतोय. पुढच्या कारवाई साठी जंगलातले कॉम्रेड संपर्कात आहेत.
- पत्रात शस्त्र आणि दारुगोळा विकत घेण्याचा गरजांबाबत विचारणा. नेपाळच्या अरुण आणि वर्णन चा उल्लेख 4 लाख राऊंड ची मागणी करताना आला आहे.
- ते घेण्यासाठी नेपाळमध्ये संपर्क केलाय आणि फक्त वरवरा राव यांना फक्त खरेदीसाठीचे बोलायचे अधिकार आहे त्यासाठी मणिपूर चे कॉम्रेड मदत करताहेत.