माओवाद्यांचा पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, पोलिसांचा खळबळजनक खुलासा

माओवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. अशी खळबळजनक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

पुणे, ता. 29 ऑगस्ट : मंगळवारी अटक करण्यात आलेल्या माओवादी समर्थक नेत्यांना आज पोलिसांनी पुणे न्यायालयात हजर केलं आणि सर्वांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. माओवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. रोड शोच्या दरम्यान घातपात घडवून राजीव गांधीची ज्या पद्धतीनं स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. त्याच पद्धतीने घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा कट होता अशी खळबळजनक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. देशाविरूद्ध युद्ध पुकारण्याचा त्यांचा कट होता असंही पुणे पोलिसांनी न्यायालयाला म्हटलं आहे. पोलिसांच्या या खुलाश्यामुळं खळबळ उडाली आहे.मंगळवारी काय झालं?भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी आज देशातल्या अनेक शहरांमध्ये माओवादी समर्थकांवर छापे घातले. या छाप्यातून भीमा कोरेगाव प्रकरणातला त्यांचा संबंध स्पष्ट झाला असला तरी इतर अनेक प्रकरणांमध्येही खळबळजनक माहिती आणि धागेदोरे पोलिसांना मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पोलीस लवकरच याबाबत खुलासा करणार आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणी दंगलीचं माओवादी कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे घालून माओवादी विचारवंतांना अटक केलीय.

माओवादी समर्थक विचारवंत आणि विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलीसांनी अटक केलीय. पोलिसांच्या एका विशेष पथकाने राव यांच्या हैदराबादमधल्या घरी छापा टाकून ताब्यात घेतलं. राव यांना नामपल्लीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पुण्याला आणण्यात येणार आहे.या कारवाईनंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर येऊन कारवाईला विरोध केला. राव हे माओवादी समर्थक विचारवंत समजले जातात. आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधीही त्यांच्यावर माओवादी समर्थक असल्याचे अनेकदा आरोप झाले होते आणि प्रचंड टीकाही झाली होती. 

Trending Now