पुण्यातही एमपीएससी परिक्षार्थींचा सरकारविरोधात मूक मोर्चा

औरंगाबादपाठोपाठ पुण्यातही एमपीएससीच्या भोंगळ कारभाराविरोधात परिक्षार्थींनी आज मोर्चा काढला. शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Chandrakant Funde
08 फेब्रुवारी, पुणे : औरंगाबादपाठोपाठ पुण्यातही एमपीएससीच्या भोंगळ कारभाराविरोधात परिक्षार्थींनी आज मोर्चा काढला. शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यशासनाने राज्यसेवेच्या जागा वाढवाव्यात. पीएसआय, आणि एसटीआय या परीक्षा संयुक्तरित्या न घेता स्वतंत्र घ्याव्यात, या दोन्ही पदांच्या अवघ्या ६९ जागा काढून एमपीएससीने परिक्षार्थींची चेष्टा केलीय. त्यामुळे या जागा ५०० पर्यंत वाढवाव्यात. अशा अनेक मागण्या मांडत विद्यार्थ्यांनी हा धडक मूक मोर्चा काढला. दरम्यान, एमपीएससीच्या आरक्षण अंमलबजावणीविरोधात काही पीडित परिक्षार्थी हायकोर्टात गेलेत. हायकोर्टाने एमपीएससीच्या सर्व भर्ती प्रक्रियेला स्थगिती दिलीय. पण याबाबत एमपीएससीकडून कोणताच जाहीर खुलासा केलेला नाही. त्यामुळे परिक्षार्थींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. एकूणच एमपीएससीच्या या गलथान कारभाराविरोधात परिक्षार्थींमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे.एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या1) राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी

2) संयुक्त परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणे PSI/STI/ASO ची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी3) MPSC ने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी4) MPSC ने परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावेत5) राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी6) MPSC ने तामिळनाडू पॅटर्न राबवावा7) तलाठी पदाची परीक्षा MPSC द्वारे घेऊन जास्तीत जास्त पदांची जाहिरात काढावी8) MPSC ने C-SAT या विषयाचा पेपर UPSC च्या धर्तीवर पात्र करावा9) स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआय मार्फत करण्यात यावी10) आयोगाकडून जे प्रश्न चुकतात आणि रद्द करण्यात येतात त्याचे आयोगाने संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे11) राज्य आणि जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्यात  

Trending Now