'नवरा चारित्र्यावर संशय घ्यायचा,दारू प्यायला सांगायचा',आॅडिओ रेकाॅर्डकरून पत्नीची आत्महत्या

पद्मराज ढुंगणा हा एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

पिंपरी चिंचवड, 28 आॅगस्ट : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून एका नेपाळी महिलेनं आॅडिओ रेकाॅर्ड करून आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये. धक्कादायक म्हणजे हा पती आपल्या पत्नीला मित्रांसमोर दारू पिण्यासाठी जबरदस्ती करायचा अखेर त्याच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.पवित्रा पद्मराज ढुंगणा (वय ३३ ) असं या आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. त्यांच्यामागे दोन मुले, आणि मुलगी, पती असा परिवार आहे. पद्मराज ढुंगणा हा एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तर मयत पवित्राही धुणे भांडी करत असे. 

दरम्यान, पवित्रा यांच्या भावाला तिच्या मोबाईलमध्ये आत्महत्येपूर्वी केलेल्या काही व्हॉईस रेकॉर्डिंग सापडल्या. त्यामध्ये पती चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता. तसंच मलाही दारू पिण्यास सांगत होता. त्यांच्या मित्रांनी माझाशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याने आत्महत्या केल्याचा धक्कदायक खुलासा केलाय. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

Trending Now