Palghar By-election Result 2018: योगींच्या मॅजिकसमोर शिवसेनेचं हिंदुत्व कार्ड फेल !

पालघरमध्ये शिवसेनेनं आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला होता. त्यालाच टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

Sachin Salve
पालघर, 31 मे :  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेनं संपूर्ण ताकदपणाला लावली. पण अखेर भाजपने यात बाजी मारली. भाजपच्या विजयासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भूमिका महत्त्वाची ठरली.पालघरमध्ये शिवसेनेनं आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला होता. त्यालाच टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे हिंदुत्वाचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांनाच प्रचारात प्राचारण केलं. भाजपची ही खेळी फायद्याची ठरली.पालघरमध्ये ख्रिश्चन समाजाचं प्राबल्य आहे. त्याविरोधात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठीही योगी आदित्यनाथांना बोलावलं गेलं. विरारमध्ये पार पडलेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत उत्तरभारतीयांची मनं जिंकली. विशेष म्हणजे, विरार, बोईसर,वसई, नालासोपरा या पटट्यात उत्तरभारतीयांची संख्या जास्त आहे. हेच साधून भाजपने योगींचं प्राचारण केलं होतं.

दरम्यान,सर्व देशाचं लक्ष्य लागून असलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजय झाले आहे. राजेद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलंय.आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. २८ व्या फेरीत गावित यांना २,६८,१६४ मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना २,४०,६१९ मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,१६,९५३ मतं मिळाली. गावित 44589 मतांनी विजयी झाले. 

Trending Now