लष्कराच्या 'हिटलिस्ट'वरच्या आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा

लष्काराच्या हिटलिस्टवर असलेल्या आणखी एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाने आज ठार केलं. शकूर अहमद डार असं त्याचं नाव असून लष्कर ए तोयबाचा तो विभागीय कमांडर आहे.

Ajay Kautikwar
श्रीनगर,ता.24 जून : लष्काराच्या हिटलिस्टवर असलेल्या आणखी एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाने आज ठार केलं. शकूर अहमद डार असं त्याचं नाव असून लष्कर ए तोयबाचा तो विभागीय कमांडर आहे. दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाव इथं झालेल्या चकमकीत डार मारला गेला.

 महाघाडीची शक्यता नाही, राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसल्याचे पवारांचे स्पष्ट संकेत

  साम-दाम-दंड नीतीचा वापर करून निवडणूक जिंका - लोणीकर

ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत कारवाई करताना कुलगाम जवळच्या काजीगुंद भागातल्या नौबग कुंड गावात ही चकमक झाली. या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने त्या घराला वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. डारला शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं मात्र त्यानं गोळीबार सुरू केला. लष्करानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. तर अन्य एका घटनेत एक दहशतवादी शरण आला.

हिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर

वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या क्रूर नातवाला अटक

काश्मीर खोऱ्यात असलेल्या दहशतवाद्यांची लष्कराने एक यादी तयार केली असून त्यांना शोधून ठार करण्यात येत आहे. ऑपरेशन ऑल आऊट असं या मोहिमेला नाव देण्यात आलंय. रमाजान निमित्त महिनाभर ही मोहिम बंद होती. आता नव्याने ती सुरू करण्यात आली असून गेल्या तीन दिवसांमध्ये सहा अतिरेक्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.  

Trending Now