राहुल गांधींच्या 'गळा' आणि 'डोळा' भेटीला मोदींनी असं टोलवलं

तुम्ही म्हणतात डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. होय आम्ही बोलू शकत नाही कारण मी एका सर्वसामन्य घरातून आलोय.

नवी दिल्ली,20 जुलै : ज्यांना माझ्या जागेवर बसायची घाई झालीये ते आज इथे येऊन मला उठा उठा म्हणत होते. पण इथं बसवणं उठवण केवळ 125 कोटी जनतेच्या हाती हे त्यांनी लक्षात ठेवावं असं म्हणत गळाभेट घेणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोचक टोला लगावला. तसंच आम्ही तुमच्या डोळ्यात डोळे टाकून बोलू शकत नाही, कारण तुमच्या डोळ्यात डोळे घालून आजपर्यंत तुमच्या नेत्यांसोबत काय केलं ?, असा खोचक टोलाही मोदींना लगावला.पंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समजराहुल गांधींनी केलेला आरोपाचा समाचार घेत नरेंद्र मोदींनी सडकून टीका केली. काँग्रेसला स्वता:वरच विश्वास नाहीये, ही त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे. म्हणून संख्याबळ नसतानाही त्यांनी अविश्वास ठराव आणला. टीडीपीही आपलं अपयश लपवण्यासाठी हा खटाटोप केलाय. तुम्ही आम्हाला भागीदार म्हणताय, होय आम्ही भागीदार आहोत, आम्ही  चौकीदार आहोत, आम्ही भागीदार आहोत सर्वसामन्य जनतेच्या सुखात, शेतकऱ्यांच्या दुखात, पण तुमच्यासारखे आम्ही सौदागर नाही  अशा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.

तुम्ही म्हणतात डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. होय आम्ही बोलू शकत नाही कारण मी एका सर्वसामन्य घरातून आलोय. म्हणून तुमच्यासारख्या नामदारांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. तुमच्या डोळ्यात डोळे घालणाऱ्या नेत्यांचं काय झालं, शरद पवारांनी तुमच्या डोळ्यात डोळे टाकले तर काय केलं त्यांच्यासोबत ? अशी आठवणच मोदींनी करून दिली.

राहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक : 'गळा भेट' आणि 'डोळा भेट'

काँग्रेस देशातमध्ये अशांततेचं वातावरण निर्माण करत आहे, राजकीय अस्थिरता निर्माण करत आहे आणि काँग्रेसची सवय आहे. सर्जिकल स्ट्राईकवर तुम्हाला विश्वास नाहीये, मी तुमच्या शिव्या खाण्यासाठी तयार आहे पण देशासाठी लढणाऱ्या जवानांना अविश्वास दाखवू नका असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला. तसंच देव तुम्हाला एवढी शक्ती देवो की 2024 मध्येही तुम्हाला अविश्वास ठराव मांडावा लागेल असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला.दरम्यान, अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला. भ्रष्टाचार, जातीयवाद, महिलांवरचे अत्याचार असे सगळे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले. त्यांच्या अनेक मुद्यांवरून वाद आणि गोंधळही झाला. अध्यक्षांना एकदा कामकाज तहकूबही करावं लागलं. कामकाज सुरू झाल्यानंतर राहुल गांधींनी प्रेम आणि व्देषाचा मुद्दा उपस्थित केला. मी नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली मात्र त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा मला तुमच्याबद्दल आदरच आहे. मात्र माझ्याबद्दल तुमच्या मनात व्देष भरला आहे. कमालीचा व्देष भरला आहे. असं म्हणत राहुल गांधी आपल्या आसनावरून चालत पंतप्रधानांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. राहुल गांधींच्या या अनपेक्षीत कृतीनं सर्व सभागृह आश्चर्यचकीत झालं. राहुल काय करत आहेत ते मोदींनाही काही क्षण समजलच नाही.

Trending Now