मराठा आरक्षण : सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणेंचा आरोप

सत्तेतलेच काही लोक आणि विरोधक आंदोलनाच्या आगीत तेल घालण्याचं काम करत आहेत असा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

Sachin Salve
मुंबई,ता.31 जुलै : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सत्तेतलेच काही लोक आणि विरोधक आंदोलनाच्या आगीत तेल घालण्याचं काम करत आहेत असा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना आणि पोलीसांना याची माहिती आहे असंही ते म्हणाले. न्यूज18 लोकमला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. सध्याचा आंदोलनाचा उडालेला भडका हा मराठा आरक्षणासाठी नसून आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठीच आहे. सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठीच आग भडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं.सत्तेतले आग भडकविणारे लोक कोण या प्रश्नावर मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. याची माहिती मुख्यमंत्री आणि पोलीसांना आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातले काही लोक हे आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचं राणेंनी अप्रत्यक्ष सूचीत केल्यानं राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल असं आश्वसन दिलं होतं. त्यानंतर आंदोलन थांबायला पाहिजे होतं. मात्र असं न होता आंदोलनाचा भडका उडवण्यात आला हे योग्य झालं नाही. आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. असं असताना अहवालाची वाट पाहायला पाहिजे होती.

आणखी काय म्हणाले राणे?शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं अज्ञान.बाळासाहेब, उद्धव आणि राज ठाकरेंचा मराठा आरक्षणाला कायम विरोध होता. आता आंदोलन उग्र झाल्याने राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी समर्थनाची भूमिका घेतली.शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. असं असताना त्यांनी त्या वेळी आरक्षणासाठी काय केलं ते सांगितलं पाहिजे. आरक्षासाठी घटना बदलण्याची गरज नाही.आंदोलन भडकविण्यात काही इतर घटकांचाही समावेश आहे. पोलीसांनी त्याची माहिती आहे.भाजप, मुख्यमंत्री आणि राणेंना श्रेय मिळू नये यासाठी आगीत तेल घालण्याचं काम सुरू आहे.आदोलकांनी शांतता राखावी आणि पोलीसांनीही संयमानं भूमिका घ्यावी. आंदोलनात खटले दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही.  

Trending Now