अनैतिक संबंधात पत्नी ठरत होती अडसर, निर्घृणपणे पतीने केला खून

किनवट येथे भरदिवसा झालेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या हत्येचा उलगडा झाला. मयत सुरेखा राठोड यांचा खून त्यांचा पती विजय राठोड याने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 नांदेड, 24 आॅगस्ट : वासनेच्या आहारी गेलेल्या माणूस कोणत्या थराला पोहचेल याचा नेम नाही. आपल्या अनैतिक संबंधाला पत्नी आडकाठी येते म्हणून एका मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीचा घरात धारदार शस्त्राने निर्घृण खून केलाय. किनवट येथे भरदिवसा झालेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या हत्येचा उलगडा झाला. मयत सुरेखा राठोड यांचा खून त्यांचा पती विजय राठोड याने केल्याचे निष्पन्न झाले आहे.विजय राठोड याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या अनैतिक संबंधात पत्नी सुरेखा राठोड अडथळा ठरत असल्याने विजय राठोड याने अत्यंत निर्घृणपणे आपल्याच घरात सुरेखा राठोड यांचा खून केला. आरोपीला पोलिसांच्या श्वानाने देखील ओळखले. त्या स्वत: या संस्थेच्या संचालिका होत्या. तर विजय राठोड हा एका आश्रमशाळेत शिक्षक आहे. तसंच तो राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या आहे. राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्यासोबत त्याचे अनैतिक संबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी विजय राठोडसह त्याची प्रेयसी आणि अन्य चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला. विजय राठोडला पोलिसांनी अटक केली.

काय घडलंकिनवट तालुक्यातील गोकुंदा येथील शिवनगर पती विजय राठोड आणि मुला मुलींसह त्या राहत होत्या. सुरेखा राठोड यांचे पती विजय राठोड शिक्षक असून सकाळी वानोला येथे ड्युटीसाठी गेले होते. सुरेखा राठोड ह्या शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.पत्नी सुरेखा घरी होत्या. सुरेखा राठोड या शाळेत न आल्याने दुपारी बारा वाजताच्या सुमारास एक सेविका शिवनगर येथीलत्यांच्या घरी आली तेव्हा रक्ताच्या थारोड्यात सुरेखा राठोड यांचा मृतदेह तिला दिसला. तिने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली होती. पोलिसांना ही माहिती देण्यात आल. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मयत सुरेखा राठोड यांच्या अंगावर अनेक वार होते. घरातील साहित्य देखील अस्तव्यस्त पडलेले होते. तेव्हा आरोपी आणि मयत सुरेखा यांच्यात झटापट झाली असावी असा पोलिसांचा अंदाज होता.

Trending Now