नालासोपरा शस्त्रसाठा प्रकरण : संशयितांकडून बॉम्ब बनवण्याची पुस्तकं हस्तगत

 पुणे, 11 आॅगस्ट : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून एक एक धक्कादायक माहितीसमोर येत आहे. पुण्यातील संशयितांकडून बाॅम्ब बनवण्याची पुस्तके सापडली आहे. कालच्या नालासोपारा कारवाईनंतर आज एटीएसनं राज्यभर धाडसत्र सुरू केलंय. या प्रकरणी पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे एटीएसनं आणखी दोन जणांना कोंढवा आणि पर्वती इथून ताब्यात घेतलंय. त्यातील एका संशयीताचं नाव जाधव असल्याचं समजतंय. या प्रकरणी राज्यभरातून आणखी काहीजणांना एटीएस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने आपली कारवाई अधिक तीव्र करत राज्यभरातून आणखी १२ जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण शुक्रवारी अटक केलेल्या तीन प्रमुख आरोपींच्या नियमित संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.जप्त केली शस्त्र

१० गावठी पिस्टल मॅग्झीन १ गावठी कट्टा १ एअर गण १० पिस्टल बॅरल ०६ अर्धवट तयार पिस्टल ०६ पिस्टल मॅग्झीन ३ अर्धवट तयार मॅग्झीन ०७ अर्धवट तयार पिस्टल स्लाईड १६ रिले स्विच ०६ वाहनांच्या नंबर प्लेट्स ०१ ट्रिगर मॅग्झीन ०१ चाॅपर ०१ स्टील चाकूदरम्यान,आतापर्यंत एटीएसनं तब्बल 12 जणांना ताब्यात घेतलीय. ताब्यात घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. एटीएसच्या कारवाईत वैभव राऊत कडून 20 बॉम्ब आणि 2 जिलेटनच्या कांड्या हस्तगत करण्यात आल्या होत्या.आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या सर्वांची कसून चौकशी केली जात असून नेमके या संपूर्ण कटाचे लक्ष्य कोण होते याचा तपास एटीएसद्वारे केला जात आहे. तसंच यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांशी या आरोपींचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास केला जात आहे.सीसीटीव्ही जप्तगोवंश रक्षा समिती आणि हिंदू जनजागृती समितीशी संबधित असलेल्या वैभव राऊत आणि अटकेत असलेल्या इतर दोन आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या अाधारे एटीएसने राज्यभरातून आणखी १२ जणांची धरपकड केल्याचे समजते. ऐन सणासुदीच्या दिवसांत घातपात घडवण्याचा या टोळक्याचा कट होता का, याचा तपास केला जात आहे. या कटाची व्याप्ती नेमकी किती आहे, याबाबत विशेष करून एवढ्या माेठ्या प्रमाणावर आणलेली स्फोटकं नेमकी कशी आणि कुणाकडून आणली गेली, तसंच ती कुठे वापरली जाणार होती, त्यांचा हेतू नेमका काय होता, हे शोधण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान नालासोपारा येथील भांडार आळीतील एका सीसीटीव्हीचे फुटेज स्थानिक पोलीसांनी जप्त केले आहे. गेल्या आठ पंधरा दिवसांत वैभव राऊतला भेटायला कोणी आले होते का याची तपासणी या फुटेजद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली.संबंधीत बातम्या

मुंबईत बॉम्बची फॅक्टरी, कोण आहे वैभव राऊत?

खळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडारवर', 20 बॉम्ब जप्त

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यात

कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?

हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' !

Trending Now