पाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सिध्दू यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती.

नवी दिल्ली, 20 आॅगस्ट : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच भोवलंय. सिध्दू यांच्याविरोधात मुजफ्फरपुरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानचे सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली त्यामुळे भारताचा अपमान केलाय असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्ध पाकिस्तानला जाऊन वाद ओढावून घेतला.  २२ वे पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटर आणि तेहरिक- ए- इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी शपथ घेतली. यावेळी नवज्योत सिंग सिध्दू यांनी हजेरी लावली होती. यावेळी सिध्दू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. तसंच पाकिस्तान अधिकृत काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला बसले. मसूद खान यांच्या बाजूला बसलेल्या सिध्दू यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.इम्रान यांच्या शपथविधी सोहळ्याच्याच दिवशी शनिवारी सकाळी पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबारी करण्यात आली. अशावेळी सिद्धू यांचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना गळाभेट करणं अनेकांना पटलं नाही. यावरुनच सिध्दू सोशल मीडियावर ट्रोल झाले.

भाजपनेही सिध्दू यांच्या या कृत्याचा सडकून टीका केली. तसंच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सिध्दू यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती.मात्र, सिध्दू यांनी स्वत:चा बचाव करत आपली बाजू मांडली. जर तुमच्याकडे कुणी येऊन जर आपण एका संस्कृतीचे असून गुरु नानदेव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वच्या दिवशी करतारपुर सीमा खोलणार असं सांगतल्यावर काय करणार ? असं सिद्ध यांनी म्हटलंय. तसंच जर तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं असेल आणि जिथे बसायला सांगितलं मी तिथेच बसलो. मलाच मसूद खान यांच्याजवळ बसायला सांगितलं असा खुलासा सिध्दू यांनी केला.फोटो गॅलरी - कॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी

Trending Now