डीएसकेंना कोठडीत पाठवण्यासाठी एक क्षणही पुरेसा, पण...!- हायकोर्ट

तुम्हाला कोठडीत पाठवून लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत, म्हणून आम्ही तुम्हाला आणखी काही दिवसांची सवलत देत आहोत, अशा कडक शब्दात आज हायकोर्टाने डीएसकेंना सुनावलं

Chandrakant Funde
25 जानेवारी, मुंबई : गुंतवणूकदारांचे 50 कोटी भरण्यास डीएसके पुन्हा अपयशी ठरल्याने मुंबई हायकोर्टाने आज त्यांना चांगलंच फटकारलं. डीएसकेंना पोलीस कोठडीत पाठवण्यात आम्हाला एक क्षणभरही पुरेसा आहे. पण तुम्हाला कोठडीत पाठवून लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत, म्हणून आम्ही तुम्हाला आणखी काही दिवसांची सवलत देत आहोत, अशा कडक शब्दात आज हायकोर्टाने डीएसकेंना सुनावलं, त्यावर बँक व्यवहारातील काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा करू शकलो नसल्याचा दावा डीएसकेंनी हायकोर्टाने केलाय.त्यानंतर हायकोर्टाने 5 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांचे 50 कोटी हायकोर्टात जमा करण्याचे निर्देश डीएसकेंना दिलेत. दरम्यान, डीएसकेंनी, १ फेब्रुवारीपर्यंत बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा करण्याची हमी हायकोर्टाला दिलीय. डीएसकेंच्या खात्यात पैसे जमा करणारे अरविंद प्रभुणे कोर्टात हजर होते. डीएसकेंच्या खात्यात 51 कोटी जमा केल्याची हमी प्रभुणे यांनी जातीनं हायकोर्टात हजर राहून दिली. एक फेब्रुवारीपर्यंत बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा करण्याची डीएसकेंकडून हमी घेण्यात आली. दोन फेब्रुवारीपर्यंत डीएसकेंना लिलावासाठी योग्य अश्या मालमत्तेची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुलकर्णींना पाच फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून असलेला दिलासा कायम आहे. 

Trending Now