दिलेल्या शब्दाला जागले राज ठाकरे, गिरगावकरांच्या मदतीला धावले

गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारलीय. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरले आहेत.

मुंबई, 01 ऑगस्ट : गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारलीय. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे गिरगावच्या खेतवाडीत पोहचले आहेत. दक्षिण मुंबईतील गणेशोत्सवातील मंडपांचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटून ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंडपांसाठी मुंबई मनपा परवानगी देत नसल्याची गणेश मंडळांची तक्रार आहे. त्यामुळे त्या भागाची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे गिरगावात पोहोचले आहेत.मुंबईत गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारली त्याचबरोबर मंडप उभारणीसाठी जाचक अटी घातल्या आहेत. या सगळ्यावर आता उपाय काढण्यासाठी राज ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहे. तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्तही केलं. त्यामुळे आता राज यावर काय तोडगा काढणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.आरक्षणाच्या आंदोलनांमुळे फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पादचारी आणि वाहतूकीला अडथळा होणार नाही, अशी भूमिका पालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी घेतली आहे. त्यामुळे आकर्षक आणि सगळ्यात मोठ्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुबंई गिरगावच्या खेतवाडीत भागात मंडपाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर मंडप लहान स्वरूपाचे बांधायचे तर मग गणेश मुर्त्या कशा आणायच्या असा प्रश्न इथल्या मंजडळांना पडला आहे. त्यामुळे आता यावर राज ठाकरे न्यायालयाचा आदेश राखणार की मंडळांची मागणी पुरवणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे.हेही वाचा...पालघरमध्ये एका झाडाने वाचवला 90 जणांचा जीवमराठा आरक्षण : सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणेंचा आरोपघर बसल्या केले हे व्यायाम तर नाही करणार कंबर आणि पाठदुखीची तक्रार

Trending Now