मराठा आरक्षण : समाजकंटकांमुळेच हिंसाचार, यापुढचं आंदोलन शांततेनेच होणार

आंदोलनात झालेला हिंसाचार हा काही समाजकंटकांनी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी केला होता.

News18 Lokmat
पुणे,ता.10 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी आता यापुढे रस्त्यावर नाही तर शांततेनेच आंदोलन करू, आंदोलनात झालेला हिंसाचार हा काही समाजकंटकांनी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी केला असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केला. पुणे जिल्हा समन्वय समितीने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमीका स्पष्ट केली. औरंगाबादमधल्या वाळूंज एम.आय.डी.सी परिसरात आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणीही समितीने आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त काच फुटली होती. त्यामुळे झालेलं नुकसान हे समन्वय समितीच्या वतीन भरून देण्यात येईल असं समितीच्या वतीने सांगण्यात आलं.

VIDEO : रामानेही सीतेला सोडलं होतं : तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य

धक्कादायक VIDEO, सोमेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची लांबी भरून दिला रंग

वाळूंज एम.आय.डी.सीतल्या कामगारांचे पगार थकल्याने त्यांनी हिंसाचार केला. यात आंदोलकांचा सहभाग नव्हता. यापुढे आत्मक्लेश आणि चक्री उपोषण करून आंदोलन करण्यात येईल अशी घोषणाही समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीत ही भूमिका मांडण्यात येणार असून राज्यभर शांततेच्याच मार्गाने आंदोलन करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.शाळेतल्या मुलांनी साजरी केली 'गटारी' पण 'दिवे' लावून!कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. जाळपोळ, दडगफेक आणि बंद मुळे कोट्यवधींच नुकसान झालं. बस आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं त्यामुळे आंदोलकांवर टीका होतेय. त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेऊन आंदोलकांनी आता शांततेची भूमीका मांडली आहे.

Trending Now