माओवादी समर्थकांच्या नजरकैदेत 17 सप्टेंबरपर्यंत वाढ

नवी दिल्ली,ता.12 सप्टेंबर : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या माओवादी समर्थकांच्या नजरकैदेत सुप्रीम कोर्टानं 17 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर पुढची सुनावणी होणार आहे. माओवादी समर्थकांचे वकिल अभिषेक मनू सिंघवी सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला. वरवरा राव, अरुण परेरा, वर्णन गोंसालविस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांना ऑगस्टमध्ये पुणे पोलिसांनी विविध शहरांमध्ये छापे टाकून अटक केली होती. या अटकेविरोधात रोमीला थापर आणि काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या सर्वांना अटक न करता नजरकैदेत ठेवा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी सर्व पाचही जणांची पोलिसांना कोठडी हवी आहे. या सर्वांकडून पोलिसांनी जी कागदपत्र जप्त केली होती त्यात अनेक धक्कादायक आणि खळबळजनक गोष्टी बाहेर आल्या होत्या.हे सर्व जण माओवाद्यांच्या संपर्कात असून समाजात असंतोष पसरवणं, सरकार उलथून टाकण्याचा कट रचनं, हिंसक घटना घडवणं असा त्यांचा डाव असल्याचं पत्रव्यवहारामधून उघड झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

काय आहे त्या पत्रांमध्ये?रोना विल्सन यांनी सेंट्र्ल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं पत्रशहरी भागातल्या लोकांना जंगलात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जास्तित जास्त असंतोष निर्माण झाला पाहिजे. मोदी राज संपवण्यासाठी युद्ध पुकारलं पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या खेरदीसाठी 8 कोटी रूपयांची जमवाजम झाली आहे. शस्त्र खरेदीचे पूर्ण अधिकार वरवर राव यांना दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर हँड ग्रेनेड आणि चार लाख गोळ्यांची खेरदी होणार असून नेपाळ आणि मणिपूरमधल्या पुरवठादारांशी संपर्क साधण्यात आलाय. राजीव गांधींची हत्या ज्या प्रकारे झाली तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली पाहिजे.सुधा भारव्दाज यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं पत्रकाश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांशी संपर्कात आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. शहरात संशोदन करणारे फेलो, बुद्धिवादी नेते यांना आपली विचारसरणी पटवून देऊन त्यांना गडचिरोली आणि इतर ठिकाणी आणलं पाहिजे.गौतम नवलखा यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड सुदर्शन यांना लिहिलेलं पत्रलोकांवर अत्याचार होत आहेत. त्या विरूद्ध पेटून उठलं पाहिजे. एल्गार परिषदेसारखे कार्यक्रम घेऊन त्यातून जास्तित जास्त असंतोष कसा भडकेल याची काळजी घेऊ. एखाद्या दलित तरूणाचा मृत्यू झाल्यास त्याचं खूप भांडवलं केलं पाहिजे. म्हणजे असंतोष वाढेल.रोना विल्सन यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं आणखी एक पत्र2013 पासून मोठी कारवाई झालेली नाही. कुठली शस्त्रास्त्र खरेदी करायची आहेत याचे फोटोही विल्सन यांनी प्रकाश यांना पाठवले होते. यात रशिया आणि चीनमधल्या मशिनगन्सचे फोटो असून ते विल्सन यांच्या लॅपटॉपमधून पोलिसांनी डी कोड करून हस्तगत केले आहेत.वरवर राव यांनी नागपूरचे वकिल सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेलं पत्रनोटबंदीमुळे जंगलातल्या लोकांना पैशाची अडचण भासत आहे. तुमच्याकडे पैसे पाठवले होते मात्र त्याच वितरण अजून झालं नाही अशी माहिती आहे. नेमकं काय झालं तेही कळत नाही. पैसे नसल्यानं कारवाया थंडावल्या आहेत.वरवर राव यांच्या या पत्राला सुरेंद्र गडलिंग यांनी दिलेलं पत्रनोटबंदीमुळं तपासणी जोरात सुरू होती. त्यामुळं गडचिरोलीत पैसे पाठवायला उशीर झाला. दुसरं काहीही कारण नाही. तुम्ही दिलेले पैसै आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. आणि त्या पैशांचा पुरवढा सुरू केला आहे. आणि काही रक्कम पोहोचलीही आहे.सेंट्रल कमेटीचे सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांनी महाराष्ट्र विभागाच्या कमेटीला लिहिलेलं पत्रजेएनयु आणि इतर भागातून मुलं जंगलात पाठवली पाहिजे. सरकारविरूद्ध युद्ध पुकारलं पाहिजे. बऱ्याच दिवसांमध्ये मोठी कारवाई झाली नाही. जास्तित जास्त असंतोष भडकला पाहिजे. म्हणजे सरकारविरूद्ध असंतोष निर्माण होईल.

VIDEO : काँग्रेसचे नेते दीड तास अडकले रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये !

  

Trending Now