VIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी मुंबई हायकोर्टात सुरू आहे. या केसमधले एक आरोपी मेजर (नि) रमेश उपाध्याय लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. कोर्टाबाहेर न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या बातमीला दुजोरा दिला. उपाध्यायला गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारा मेजर रमेश उपाध्याय हा पाचवा आरोपी आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी मुंबई हायकोर्टात सुरू आहे. या केसमधले एक आरोपी मेजर (नि) रमेश उपाध्याय 2019ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कोर्टाबाहेर न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या बातमीला दुजोरा दिला. उपाध्यायला गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारा मेजर रमेश उपाध्याय हा पाचवा आरोपी आहे. पश्चिम बंगालमधल्या जाधवपूर मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचं उपाध्याय म्हणाले. मालेगाव बाँबस्फोट खटला NIA कोर्टात चालणार नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Trending Now