पळून जाऊन लग्न करायचं? पहिले प्रेयसीच्या नावाने करावी लागणार एफडी

प्रेयसीला तिच्या घरातून पळून नेवून लग्न करायचं असेल तर तिच्या खात्यात आता पैसे जमा करावा लागणार आहेत.

चंदिगड,ता.10 ऑगस्ट : प्रेयसीला तिच्या घरातून पळून नेवून लग्न करायचं असेल तर तिच्या खात्यात आता पैसे जमा करावा लागणार आहेत. ही रक्कम 50 हजार ते तीन लाखांच्या दरम्यान असेल. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं हा निकाल दिलाय. पळून जावून लग्न केलेल्या एका दाम्पत्याने सुरक्षा मिळावी अशी याचिका कोर्टात केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने हा आदेश दिलाय. पंजाब आणि हरियाणात दररोज 20 ते 30 जोडपी पळून जावून लग्न करतात. घरच्यांचा विरोध असल्याने यातले अनेक तरूण कोर्टात अर्ज करून पोलीस संरक्षणाची मागणी करतात. अशी प्रकरणं वाढल्याने कोर्टानं हा निर्णय घेतलाय. पळून जावून लग्न केल्यानंतर त्या तरूण आणि तरूणीला कुटूंबियांकडून धमकावलं जातं. पंजाब आणि हरियणात अशा प्रकरणात अनेकदा त्यांचा जीवही जातो. त्यामुळे प्रेमविवाह झाल्यानंतर खासकरून तरूणींना जास्त त्रासाला सामोरे जावे लागतं.

मराठा आरक्षण : समाजकंटकांमुळेच हिंसाचार, यापुढचं आंदोलन शांततेनेच होणार

धक्कादायक VIDEO, सोमेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची लांबी भरून दिला रंग

लग्न झाल्यानंतर ते मोडलं तर मुलीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा तरूणींची फसवणूक होते. कुटूंबियांचा विरोध पत्करून पळून गेलेल्या तरूणींना निराधार होण्याची वेळ येते त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाने हा निर्णय घेतलाय. महिनाभराच्या आत ही रक्कम भरावी लगाणार असून साडे तीन वर्षांसाठी ही रक्कम काढता यणार नाही.

कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?

दुसऱ्याला जागा देण्याच्या नादात ट्रकची दुचाकीला धडक, गर्भवती महिला चाकाखाली चिरडली

न्यायमूर्ती पी.बी.बंजथरी यांनी हा निर्णय दिला आहे. अशा प्रकरणावर न्यायालय पहिले त्या दोघांची चौकशी करते आणि नंतर सुरक्षेबाबत निर्णय देते. गेल्या काही महिन्यांमध्ये चार प्रकरणांमध्ये न्यायालयाने अशी एफडी काढण्याचा आदेश दिला आहे. एफडी जर तरूणीच्या नावेने असेल तर तीला किमान आर्थिक आधार असावा असा न्यायालयाचा उद्देश असल्याचंही न्यायमूर्तींनी हा आदेश देताना म्हटलं आहे.

Trending Now