शिवसेनेचं मिशन 'लोकसभा 2019' : हे असतील मुंबईतले संभाव्य उमेदवार?

भाजपने टाळीसाठी हात पुढे केलेला असता तरी शिवसेनेकडून टाळी देण्याची शक्यता नसून राज्यातल्या सर्व 48 जागा स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

मुंबई,ता. 28 ऑगस्ट : लोकसभा 2019 च्या निवडणूकांना अजुन किमान 8 महिन्यांचा अवधी शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केलीय. शिवसेनेच्या आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. भाजपने टाळीसाठी हात पुढे केलेला असता तरी शिवसेनेकडून टाळी देण्याची शक्यता नसून राज्यातल्या सर्व 48 जागा स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने मिशन 'लोकसभा 2019' ही योजना तयार केली असून मुंबईसह सर्वच जागांवर लवकरात लवकर उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.शिवसेना येत्या गणेशोत्सावाच्या आधी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये आणि नंतर मुंबईत भाजपने जारोदार मुसंडी मारली होती. महापालिका निवडणूकीतही भाजपने शिवसेनेची दमछाक केली होती. त्यामुळं शिवसेना अतिशय सावधपणे प्रत्येक निर्णय घेत असून मुंबईचा गड अभेद्य राहिल याची काळजी घेत आहे. त्यासाठी खास शिलेदारांसाठी जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबईतून जास्तित जास्त जागा निवडून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.लढाई अटीतटीची असल्यानं आणि युती होण्याची शक्यता धुसर असल्याने शिवसेनेतही इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. राज्यातल्या शिवसेनेच्या १९ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. लोकसभा निवडणूकीनंतर कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही तर अशा स्थितीत ज्या पक्षांकडे सर्वात जास्त खासदार त्या पक्षांची बार्गेनिंग पॉवर सर्वात जास्त राहणार आहे.अशा परिस्थितीचा फायदा घेण्याचाही शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. मुंबईत भाजप विरोधात लढण्यासाठी शिवसेनेतून काही नावं पुढे आली असून स्वबळावर लढल्यास जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

असे असतील मुंबईतले संभाव्य उमेदावर आणि लढतीउत्तर पूर्व मुंबई - खासदार पुनम महाजनच्या विरोधातमहापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा.उत्तर मुंबई - भाजप खासदार गोपाळ शेट्टीच्या विरोधात माजी महापौर शुभा राऊळ आणि उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा.ईशान्य पूर्व मुंबई -  भाजप खासदार किरीट सौमय्याविरोधात, मनसेतून आलेले शिशिर शिंदे आणि निलम गोऱ्हें यांची चर्चा.दक्षिण मुंबई - अरविंद सावंतदक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळेउत्तर पश्चिम मुंबई - गजानान किर्तीकरमुंबईत एकूण सहा जागा असून त्यात तीन खासदार हे शिवसेनेचे आहेत तर तीन खासदार भाजपचे आहेत.VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यावंधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

Trending Now