अंबरनाथनंतर आता बदलापुरात आढळली वडापावमध्ये पाल!

मुंबईची ओळख असलेल्या मुंबईचा वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ.

बदलापूर, 12 नोव्हेंबर : मुंबईची ओळख असलेल्या मुंबईचा वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. मुंबईत कुठेही गेलं तर सहज कुठेही वडापाव मिळणारच. पण तुम्ही जो वडापाव खातायत त्यात पाल तर नाही ना ?, असा प्रश्न यासाठी विचारतोय की, कारण आपल्या आरोग्याशी कसा खेळ होतोय याचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे. बदलापूरच्या एका स्नॅक्स कॉर्नरमध्ये वाडापावमध्ये चक्क मृत पाल आढलळली आहे. त्यामुळे खव्वयांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.बदलापूर पश्चिमेकडील ओम साई स्नॅक्स कॉर्नरमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तिने विकत घेतलेल्या वडापावमध्ये पाल आढळली. याबद्द्ल त्यांनी हॉटेल मालकाला तक्रार केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. याबद्दलची माहिती महापालिकेला दिली असता पालिकेने स्नॅक्स कॉर्नर सील केलं आहे.या धक्कादायक प्रकाराबद्दल पालिका दुकानाचा पंचनामा करत आहे. पुढील कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंबंधी बदलापूर पोलीस ठाण्यात स्नॅक्स कॉर्नरचा मालक हंसराज चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसं खाद्यपदार्थांमध्ये पाल सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता आहे. याच भागातल्या एका कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल या तरुणीने ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी म्हणून इथून वडापाव नेले होते. मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली. VIDEO : काँग्रेसचे नेते दीड तास अडकले रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये !

Trending Now