इंधनाचा पुन्हा भडका, मुंबईत 1 लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86 रुपये

मुंबई, 03 सप्टेंबर : मुंबईकरांनो ही बातमी तुमच्या खिशाला कात्री लावणारी आहे. कारण आता तुमचा प्रवास पुन्हा महागणार आहे. मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी आता 86 रूपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतायेत. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेली इंधनदरवाढ रविवारीही पहायला मिळाली. मुंबईत पेट्रोलचे दर 86 रुपये 25 पैसे आहेत, तर डिझेलसाठी 75 रुपये माजोवे लागतायेत. पेट्रोल आणि डिझेलच्या या वाढलेल्या दरांमुळे सामान्य नागरिक मात्र पुरता हैराण झाला आहे.या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय त्यामुळे या वाढीबद्दल पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विचारलं असता ही दरवाढ तात्पुरती आहे, असा मलम लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पेट्रोलियमवरचे कर केंद्र आणि राज्य सरकार कमी करणार का, यावर मात्र ते बोलले नाहीत.दुसऱ्या शहरांमधील इंधनाचे दर

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 86.56 रुपये प्रति लीटर तर डिझेल 75.57 रुपये प्रति लीटरकोलकातामध्ये पेट्रोल 82.06 रुपये प्रति लीटर तक डिझेल 74 रुपयांनी वाढलं आहे.दिल्लीमध्ये पेट्रोल 79.15 आणि डिझेल 71.15 रुपयांवर पोहचलं आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात का वाढ होतेय?रुपया आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसाठी जबाबदार आहेत. डॉलरच्या तुलनेत रूपये घसरत आहे. कच्चे तेलदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. तेल कंपन्यांचा खर्चदेखील वाढत आहे त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलवर होताना दिसतो.हे वाढलेले दर कमी होण्याची शक्यता नाहीएंजेल ब्रोकिंग लिमिटेडच्या संशोधन (वस्तू आणि चलन) उप-उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ब्रेंट क्रूडमध्ये 80 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय (अमेरिकन लाइट क्रूड) मध्ये 75 डॉलर प्रति बॅरलची किंमत वाढताना दिसत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. PHOTOS : 'ही' अभिनेत्री घेणार 'शनाया'ची जागा !

Trending Now