शहरी माओवाद नसतोच!,लोकांचं लक्ष वळवण्यासाठी विचारवंतांना अटक-चिदंबरम

माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद घेतली.

नागपूर, 01 सप्टेंबर : शहरी माओवाद शब्द मला मान्य नाही. ज्यांच्यावर कारवाई केली ते मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील होते. लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही कारवाई होत आहे अशी टीका माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केलीय. तसंच सोबतच राफेल विमान खरेदी वरुन मोदी सरकारवर सडकून टीका केलीये. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माओवादी थिंक टँक अटक प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.

राफेल खरेदीत घोटाळाचयूपीए सरकारने एका राफेल विमानाच्या खरेदीसाठी ५२६ कोटींची किंमत ठरवली होती, पण मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी एक राफेल विमान १६७० कोटी रुपयाला खरेदी केलं. युपीए सरकारने १८ विमान खरेदीचा निर्णय घेतला होता. पण मोदी सरकारने डबल किंमतीने ३६ विमान खरेदी केले. तात्काळ विमान खरेदीबाबात सांगण्यात आलं होतं, पण आजपर्यंत एकंही राफेल विमान भारतात आलं नाही. राफेल विमानाच्या खरेदीत मोदी सरकारने कॅबीनेट कमिटी ऑफ सिक्यूरीटी आणि डीएसीला विश्वासात घेतलं नव्हतं. 'राफेलची बोफोर्सशी तुलना नको'राफेल खरेदी घोटाळ्याची तुलना बोफोर्सशी करू नका. बापी सिंग यांनी बोफोर्स घोटाळ्याचा आरोप केला होता पण पण त्याचा पुरावा त्यांच्याकडेही नव्हता असंही चिदंबरम म्हणाले.शेअर बाजार वधारला याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था सुधारली असा होत नाही, शेअर बाजार वधरल्यानं कंपन्यांना फायदा होतो, इतर क्षेत्राला काही फायदा होत नाही असंही चिदंबरम म्हणाले.आजकाल देशात प्रत्येक विषय कोर्टात नेला जातोय, कोर्टात चर्चा होते, मात्र संसदेत कुठल्याही विषयावर चर्चा होऊ दिली जात नाही अशी टीकाही त्यांनी केली.---------------------PHOTOS :गाई-म्हशी चरायला नेणाऱ्या खेळाडूने देशासाठी जिंकले सुवर्णपदक!

Trending Now