बस्स एकच नाव इंडिया!, राष्ट्रगीत सुरू असताना सुवर्णकन्या हिमाला अश्रू अनावर

14 जुलै :  जिनं आंतराष्ट्रीय एथलेटिक्सच्या ट्रॅकवर भारतीय तिरंगा डौलानं फडकवलाय. ती देशाचं अभिमान बनलीय. राष्ट्रभक्ती काय असते हे तिच्याकडे बघितल्यावर कळतंय. भारताची धावपट्टू हिमा दासनं फिनलँडमध्ये इतिहास घडवला.

२० वर्षाखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातलीय. सुवर्ण पदक स्वीकारण्यासाठी ती पोडियमवर उभी राहिली आणि सुरू झालं भारताचं राष्ट्रगीत... तिरंगा फडकत होता...आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्नं उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या हिमाचं स्वप्नं साकार झालं होतं. राष्ट्रगीत ऐकताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

Trending Now