पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

इथं बसवणं उठवण केवळ 125 कोटी जनतेच्या हाती हे त्यांनी लक्षात ठेवावं असं म्हणत गळाभेट घेणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फटकारून काढलं.

नवी दिल्ली, 20 जुलै : देव तुम्हाला एवढी शक्ती देवो की 2024 मध्येही तुम्हाला अविश्वास ठराव मांडावा लागेल असा टोलेबाजी करत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. तसंच ज्यांना माझ्या जागेवर बसायची घाई झालीये ते आज इथे येऊन मला उठा उठा म्हणत होते. पण इथं बसवणं उठवण केवळ 125 कोटी जनतेच्या हाती हे त्यांनी लक्षात ठेवावं असं म्हणत गळाभेट घेणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फटकारून काढलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे...पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्देलोकसभेचा मोदींवर ‘विश्वास’, प्रस्तावाच्या विरोधात 325 मतं, बाजूनं 126

आम्ही तुमच्या डोळे घालून बोलणारे कोण ?आम्ही चौकीदार, भागीदार आहोत पण सौदागर नाही शरद पवारांनी तुमच्या डोळ्यात डोळे टाकले तर काय केलं त्यांच्यासोबत ?काँग्रेस देशातमध्ये अशांततेचं वातावरण निर्माण करत आहे, राजकीय अस्थिरता निर्माण करत आहे, आणि काँग्रेसची सवय आहे राहुल गांधींच्या 'गळा' आणि 'डोळा' भेटीला मोदींनी असं टोलवलंसर्जिकल स्ट्राईकवर तुम्हाला विश्वास नाहीये, मी तुमच्या शिव्या खाण्यासाठी तयार आहे पण देशासाठी लढणाऱ्या जवानांना अविश्वास दाखवू नकाविरोधकांकडून सत्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतोयदेव तुम्हाला एवढी शक्ती देवो की 2024 मध्येही तुम्हाला अविश्वास ठराव मांडावा लागेलकाँग्रेसला स्वता:वरच विश्वास नाहीये, ही त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहेमोदींनी वाचला सरकारच्या कामाचा पाढा, जनधन, गॅस सिलेंडर सबसिडीचा केला उल्लेख

राहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा?

झुंडशाहीविरोधात राज्य सरकारांनी कठोर भूमिका घ्यावीबँका सुधारण्यासाठी आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेयूपीए सरकारच्या काळात फोन बँकिंग सुरू करण्यात आली, फोन करून कुणालाही लोन मिळत होते, काँग्रेसने आपल्या लोकांना लोन देऊन बँका लुटल्याएनडीए सरकार सत्तेत आलं नसतं तर देश संकटात असतावन रँक वन पेन्शन कुणी रखडत ठेवलं, जीएसटी कुणी रोखून धरलं, काळ्या पैशासाठी एसआयटी स्थापन करण्यासाठीचा निर्णय कुणी रखडून ठेवला आंध्रप्रदेशला विशेष पॅकेज दिले, पण टीडीपीने आपलं अपयश राखण्यासाठी हा डाव खेळलाय

Trending Now