इंधनाचा भडका; सगळ्यांत महाग पेट्रोल कुठे?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचं अवमूल्यन यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. राज्यात कुठल्या राज्यात पेट्रोल सर्वांत महागडं आहे जाणून घ्या.

Arundhati Joshi
इंधनाच्या दरवाढीचा आज सलग चौदाव्या दिवशी भडका उडाला. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी १० सप्टेंबरला बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये आता जणू दरवाढीची स्पर्धाच लागली आहे. राज्या- राज्यांमध्येच नाही, तर एकाच राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत फरक आढळतो. याला कारण अबकारी कराची रचना हे आहे. कुठल्या शहरात पेट्रोल सर्वांत महाग आणि कुठे त्यातल्या त्यात स्वस्त जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. राज्यात औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर सगळ्यांत जास्त झालाय. लीटरमागे पेट्रोलला 87.96 रुपये आणि डिझेलला 77.02 रुपये औरंगाबादकर मोजत आहेत. राज्यात सगळ्यात महागडं इंधन या शहरात मिळतंय. 

चार महानगरांमध्ये मुंबईतला पेट्रोलचा दर सर्वांत जास्त आहे. पेट्रोल   86.91 रुपये तर डिझेल  75.96 रुपये​ अशी किंमत मुंबईकर मोजताहेत.  दिल्लीत इंधनाचे दर तुलनेने कमी आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल प्रति लिटर ७९. ५१ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ७१. ५५ रुपये इतके आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 87.39 रुपये एवढं महाग झालंय. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी दिलेला 'अच्छे दिन'चा नेमका अर्थ सत्यात कधी उतरणार असा सवाल सर्वसामान्य विचारतायत...  पुण्यात पेट्रोलचा दर 86.71 रुपये तर डिझेल 76.40 रुपये एवढा झालाय. त्यातल्या त्यात राज्यातल्या इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत हा दर थोडासा कमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचा दर अबकारी करामुळे बदलतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करप्रणालीचाही फरक इंधनाच्या किमतीवर पडत असतो.  

Trending Now