FIFA World Cup 2018 फ्रान्सच ठरला जगज्जेता, पॅरिसमध्ये आलं तुफान!

फ्रान्स फिफा वर्ल्डकप 2018 चा जगज्जेता ठरलाय. क्रोएशियावर 4-2नं मात करत फ्रान्सनं फिफा विश्वचषक काबीज केलाय.

मॉस्को,ता.15 जुलै : फ्रान्स  फिफा वर्ल्डकप 2018 चा जगज्जेता ठरलाय. क्रोएशियावर 4-2नं मात करत फ्रान्सनं फिफा विश्वचषक काबीज केलाय. सामन्याच्या पूर्वाधात दोनही टीमकडून जोरदार अॅक्शन पाहायला मिळाली. सामन्याच्या आठराव्या मिनीटाला फ्रान्सला फ्री किक मिळाली. फान्सला मिळालेल्या फ्री किकवर बचाव करताना क्रोएशियाच्या चुकीमुळे फान्सला पहिला ओन गोल मिळाला. त्यामुळे फान्सला आघाडी मिळाली. त्यानंतर फ्रान्सचा आत्मविश्वास वाढला. फ्रान्स कडून ग्रीझमन, एमबाप्पे आणि पोग्बा यांनी दमदार गोल करत फ्रान्सचा विजय निश्चित केला आणि क्रोएशियावर मात करत दुसऱ्यांदा फिफी वर्ल्डकपवर फ्रान्सनं आपलं नाव कोरलंय. तब्बल वीस वर्षानंतर फ्रान्सने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं.फ्रान्सच्या विजयानंतर सर्व फ्रान्समध्ये प्रचंड जल्लोष झाला. पॅरिसमध्ये तर नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. आयफेल टॉवर परिसरात नागरिक राष्ट्रध्वज घेऊन एकत्र आले. घोषणा, नाच, गाणी यांनी सर्व परिसर व्यापून गेला. तब्बल वीस वर्षानंतर मिळालेल्या विजयाने फ्रान्सला मोठ बळ मिळालं आहे.

Trending Now