कुर्बानी देण्यासाठी तयार  - नवाज शरीफ

पाकिस्तानात परिस्थिती अतिशय बिकट आहे हे लक्षात असूनही कुर्बानी देण्यासाठी मायदेशात जात असल्याचं नवाज शरीफ यांनी सांगितलं.

इस्लामाबाद, ता. 13 जुलै : पाकिस्तानात परिस्थिती अतिशय बिकट आहे हे लक्षात असूनही कुर्बानी देण्यासाठी मायदेशात जात असल्याचं नवाज शरीफ यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या पुढच्या पिठ्यांचं भविष्य उज्ज्वल घडावं यासाठी शहीद होण्यास तयार असल्याचंही त्यांनी लंडनवरून निघताना सांगितलं. शरीफ यांच्या पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू असून पत्नीला सोडून मायदेशात येत असल्याचंही ते म्हणाले.नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना पाकिस्तानात आल्यानंतर लगेच अटक करण्यात आली. लाहोर विमानतळावर पोहोचताच दोघानांही सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली. शुक्रवारी सकाळी नवाज शरीफ हे त्यांची मुलगी मरियमसह लंडनवरून पाकिस्तानकडे रवाना झाले. एतिहाद एयरवेजच्या EY243 या फ्लाईटने ते अबुधाबीमार्गे लाहोरला आले.लंडनवरून निघाताना मरियमने ट्विटरवर काही फोटो ट्विट करून शेअर केले. मरियम यांच्या मातोश्री कुलसूम नवाज यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू असून त्यांना भेटून निरोप घेतनाचे ते फोटो आहेत. सरकारने त्यांच्या अटकेची जय्यत तयारी केली होती.16 अधिकाऱ्यांचा एक गट त्यासाठी तयार करण्यात आला होता. येत्या 25 तारखेला पाकिस्तानात निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर या अटकेला महत्व प्राप्त झालंय.

Trending Now