याला म्हणतात फुटबॉल!चाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’

चाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता की राजधानी मेक्सिको सिटी हादरून गेली...भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंदही झाली यावरून चाहत्यांच्या जल्लोषाची कल्पना येवू शकते.

Ajay Kautikwar
मेक्सिको सिटी,ता.18 जून : फीफा वर्ल्ड कप सामन्यात रविवारी झालेली जर्मनी आणि मेक्सिकोच्या पहिल्याच सामन्यात मेक्सिकोनं 1-0 अशी मात दिल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता की राजधानी मेक्सिको सिटी हादरून गेली...भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंदही झाली यावरून चाहत्यांच्या जल्लोषाची कल्पना येवू शकते.मेक्सिको आणि जर्मनीची मॅच रोमहर्षक ठरली. जर्मनीच्या बलाढ्य संघाला मेक्सिकोनं जोरदार लढत दिली. बचावासाठी जगविख्यात असलेल्या जर्मनीची संरक्षक फळी भेदत मेक्सिकोनं पहिला गोल मारला आणि शेवटपर्यंत जर्मनीवर दबाव कायम ठेवला.

मेक्सिकोतल्या फुटबॉलप्रेमींचा हा जल्लोषाचा व्हिडीओ जगभर व्हायरल झालाय...नेटकऱ्यांचीही त्याला जोरदार पसंती मिळत आहे. मेक्सिकोतला हा भूकंप नैसर्गिक होता....पण त्याचं केंद्र बिंदू होतं फुटबॉलचे चाहते.      

Trending Now