विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

इंग्लंड, 04 आॅगस्ट : विराट कोहलीने केलेल्या शानदार शतकाची खेळी वाया गेलीये. इंग्लंडने कसोटी सामन्यात भारताचा पराभव केलाय. इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवलाय.एजबेस्‍टनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका पार पडत आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसलाय. इंग्लंडने अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 287 आणि 180 धावा केल्यात. तर विराट कोहलीने 149 धावांची दमदार खेळी करून 274 धावांचा टप्पा गाठला. चौथ्या दिवशी मात्र डाव पलटला टीम इंडियाचा निभाव लागू  न शकल्यामुळे 162 धावांवर संघ गारद झाला.त्याआधी इंग्लंडची संपूर्ण टीम पहिल्या डावात फक्त २८७ धावा करू शकली. यानंतर भारताच्या शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करुन देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५० धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या २० वर्षीय खेळाडू सॅम करणने सामन्याचे चित्र पालटवलं. सॅमने १४ व्या षटकाच्या चौथ्या बॉलवर मुरली विजयला बाद केले. मुरली फक्त २० धावा करु शकला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने के.एल. राहुललाही बाद केले. राहुलने फक्त ४ धावा केल्या होत्या. पुढच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवनलाही २६ धावांवर माघारी पाठवले. सॅमने केवळ आठ चेंडूत भारताच्या तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दुसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाचे सर्व खेळाडू २७४ धावाकरुन बाद झाले. भारताला हे दोन झेल चुकल्याचे महागात पडले.

Trending Now