इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली, 'विराट सेना' पराभूत

11 सप्टेंबर : इंग्लंडसोबत भारताची पराभवाची मालिका सुरूच आहे. चौथ्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. इंग्लंडने भारताला 118 धावांनी पराभव करत मालिका 4-1 खिश्यात घातली. भारत आणि इंग्लंड ओवल कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये भारताने 332 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये एलिस्टर कूक 147 तर रूटने 125 धावा करून शानदार शतक झळकावले. एलिस्टर आणि रूटच्या शानदार खेळीवर 423 धावा करून डाव घोषित केला. तर भारताला हे आव्हान पेलता आलं नाही. भारताने पहिल्या इनिंगमध्ये फक्त 40 धावांची आघाडी घेतली होती. चौथ्या इनिंगमध्ये 464 धावांचं लक्ष्य होतं. भारताकडून केएल राहुलने 149 धावा केल्या तर पंतने 114 धावा केली. दोघांमध्ये भागिदारी 204 धावांची होती. पण भारत 345 धावांवर गारद झाली.

कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यातही एलिस्टर कुकने गाजवलं मैदान!भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर एलिस्टर कुकने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक ठोकलंय. या शतकासह कुकच्या नावावर दोन नव्या विक्रमाची नोंद झालीय.कुकच्या कारकिर्दीतील हे ३३वं शतक होतं. शेवटच्या सामन्यात कुकने २८६ चेंडूत १४७ धावांची शानदार खेळी केली. शेवटच्या सामन्यात शतक झळकावणार कुक हा ४० वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर कसोटीमध्ये पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक ठोकणारा कुक हा जगातला पाचवा खेळाडू ठरलाय.त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचे रेजिनाल्ड डफ, बिल पोन्सफोर्ड, ग्रेग चॅपेल आणि भारताचा मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूंनी असा विक्रम केला होता.

Trending Now