फ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावर संसदेतच अमेरिकेचे कान टोचले.

Ajay Kautikwar
वॉश्गिंटन,ता.26 एप्रिल: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावर संसदेतच अमेरिकेचे कान टोचले. दुसऱ्यांपासून फटकून वागणं, कुणाला एकटं पाडणं किंवा टोकाचा राष्ट्रवाद हा आपल्या मनातली भीती दूर करण्यासाठी तात्कालीन उपाय असू शकतात. असं केल्यानं जगाचे दरवाजे आपण कायमचे बंद करतो हे लक्षात घेतलं पाहिजे असे खडे बोल मॅक्रॉन यांनी अमेरिकनं काँग्रेसच्या संयुक्त सभेत बोलताना सुनावले.गेल्या तीन दिवसांपासून मॅक्रॉन हे अमेरिकेच्या भेटीवर आहेत. त्यांची आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगली केमेस्ट्री या दौऱ्यात बघायला मिळाली. मात्र संसदेत बोलताना मात्र मॅक्रॉन यांनी परखड मत व्यक्त केलं.पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिका मागे घेईल आणि इराणसोबतचा अणुकरारही मोडणार नाही अशी आशाही मॅक्रॉन यांनी व्यक्त केली.

Trending Now