आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस

राहुल गांधी यांनी आचारसंहितेच्या काळात गुजरातमधील एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलीय. या मुलाखतीदरम्यान, त्यांनी पंतप्रधानांसह भाजपविरोधात टीका करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर आयोगाने ही नोटीस पाठवलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat
13 डिसेंबर, नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी आचारसंहितेच्या काळात गुजरातमधील एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलीय. या मुलाखतीदरम्यान, त्यांनी पंतप्रधानांसह भाजपविरोधात टीका करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर आयोगाने ही नोटीस पाठवलीय.या नोटीसीला राहुल गांधी यांना 18 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे. दरम्यान, ही नोटीस मिळताच काँग्रेस नेत्यांनी आयोगाच्या कार्यालय गाठून आपली बाजू मांडली आणि नोटीस देताना आयोग पक्षपात करत असल्याचा आरोप केला. भाजपच्या नेत्यांनीही प्रचारादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केलंय. मग आयोग त्यांना का नोटीस पाठवत नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केलाय. पंतप्रधानांनी फिक्कीच्या व्यासपीठाचा प्रचारासाठी गैरवापर केल्याचाही आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय.

 

 

Trending Now