डीएसकेंना 15 दिवसात 50 कोटी रुपये कोर्टात जमा करावे लागणार

डीएसकेंना हायकोर्टानं आणखी 15 दिवसांचं जीवदान मिळालंय. पण त्यासाठी त्यांना 15 दिवसाच्या आतच 50 कोटी रुपये कोर्टात जमा करावे लागणार आहेत.

Chandrakant Funde
4 डिसेंबर, मुंबई : डीएसकेंना हायकोर्टानं आणखी 15 दिवसांचं जीवदान मिळालंय. पण त्यासाठी त्यांना 15 दिवसाच्या आतच 50 कोटी रुपये कोर्टात जमा करावे लागणार आहेत. डिएसकेंनी आज गुंतवणूकदारांची देणी फेडण्यासाठी 15 दिवसात 50 कोटी जमा करण्यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. कोर्टानेही ही शेवटची संधी म्हणून हे प्रतिज्ञापत्र मान्य करत पोलिसांना पुढचे किमान 15 दिवस तरी डिएसकेंना अटक न करण्याचे निर्देश दिलेत.गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. डीएसकेंना कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच अटकेची कारवाई टाळण्यासाठी डीएसकेंनी हायकोर्टात धाव घेतलीय. या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यानच हायकोर्टाने डीएसकेंना गुंतवणूकदारांची देणी नेमकी कशी फेडणार यासंबंधीचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर डीएसकेंनी आज हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय.

Trending Now