पळून जायला काय मी गुन्हेगार आहे? -डीएसके ; अंतरिम जामिनासाठी डीएसकेंची पुणे कोर्टात धाव !

गुंतवणूकदारांच्या फसवणूक गुन्ह्यातली अटक टाळण्यासाठी पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी अंतरिम जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केलाय.

Chandrakant Funde
पुणे, 03 ऑक्टोबर : गुंतवणूकदारांच्या फसवणूक गुन्ह्यातली अटक टाळण्यासाठी पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी अंतरिम जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केलाय. अॅड. श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत हा अर्ज करण्यात आला. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक डीएस कुलकर्णी यांच्या पुण्यातील घर, ऑफिससह मुंबईतील एका ठिकाणी पोलिसांनी काल छापे घातले होते.गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणुकदारांनी, पैसे मिळत नाहीत म्हणून वारंवार तक्रारी केल्या होत्या. केवळ आश्वासनंच मिळत असल्यानं अखेर सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर काल आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई सुरु केली. यावेळी डीएसके घरी तसंच ऑफिसात नव्हते. छाप्यांची बातमी पसरताच गुंतवणूकदारही जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर आज हा जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय.दरम्यान, आपण गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणार नसल्याचं डीएसकेंनी म्हटलंय. काल आपल्या घरी पोलीस आले तेव्हा आपण कुठेही पळून गेलो नव्हतो, असाही दावा त्यांनी आयबीएन लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना केलाय. आज ना उद्या आपण गुंतवणूदारांच्या व्याजाचा परतावा नक्की देऊ, फक्त त्यासाठी मला आणखी थोडा अवधी हवा आहे. अशीही विनंती त्यांनी गुंतवणूदारांना केलीय.

 

Trending Now